इंदोरमध्ये सध्या सईद मुश्ताक अली टी20 ट्रॉफीची स्पर्धा सुरु आहे. या स्पर्धेत शुक्रवारी(22 फेब्रुवारी) गुजरात विरुद्ध राजस्थान संघात सामना पार पडला. सुपर ओव्हरपर्यंत गेलेला हा सामना गुजरात संघाने जिंकला. पण हा सामना इतका रोमांचकारी झाला की सुपर ओव्हरमध्येही या सामन्यात बरोबरी झाली होती.
या सामन्यात राजस्थानने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 7 बाद 143 धावा केल्या होत्या. तर गुजरातनेही 20 षटकात 7 बाद 143 धावा केल्या. त्यामुळे धावसंख्येची बरोबरी झाल्याने सुपर ओव्हर घेण्यात आली.
सुपर ओव्हरमध्ये प्रथम फलंदाजी करताना गुजरातने 1 बाद 4 धावा केल्या. तर राजस्थानलाही 2 बाद 4 धावाच करता आल्या. त्यामुळे सुपर ओव्हरमध्येही बरोबरी पहायला मिळाली.
अखेर या सामन्यात ज्या संघाने सर्वाधिक बाउंड्री मारल्या त्या संघाला विजयी घोषित करण्याचा निर्णय झाला आणि यानुसार गुजरातने बाजी मारली. गुजरातने या सामन्यात 16 बाउंड्री मारल्या होत्या, तर राजस्थानने 13 बाउंड्री मारल्या होत्या.
तत्पूर्वी राजस्थानकडून मानेंद्र सिंगने 48 आणि रॉबिन बिश्तने 46 धावा केल्या. तर गुजरातकडून अक्षर पटेलने सर्वाधिक 33 धावा केल्या. गोलंदाजीत राजस्थानकडून खलील अहमदने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या आणि गुजरातकडून तेजस पटेलने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या.
महत्त्वाच्या बातम्या-
–माही भाई तैयार रेहना, रिषभ पंतचे आयपीएलपूर्वी धोनीला चॅलेंज, पहा व्हिडिओ
–आयपीएल २०१९ मध्ये दिल्ली कॅपिटल्सचा संघ दिसणार नव्या अवतारात!
–असा पराक्रम करणारा जसप्रीत बुमराह बनणार दुसराच भारतीय गोलंदाज!