भारतात सध्या सुरु असलेल्या सय्यद मुश्ताक अली टी२० ट्रॉफी स्पर्धेतील साखळी फेरीचे सामने १९ जानेवारीला संपले असून आता उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केलेले अंतिम ८ संघ निश्चित झाले आहेत. तसेच कोणता संघ काणाविरुद्ध उपांत्यपूर्व फेरीतील सामने खेळणार आहे, हे देखील बीसीसीआयने निश्चित केले आहे.
उपांत्यपूर्व फेरीला २६ जानेवारी रोजी सुरुवात होईल. उपांत्यपूर्व फेरीतील चारही सामने अहमदाबाद येथील नव्याने बांधण्यात आलेल्या मोटेरा स्टेडियमवर होणार आहेत. २६ जानेवारीला २ आणि २७ जानेवारीला २ असे एकूण चार सामने पार पडतील. उपांत्यपूर्व फेरीत कर्नाटक, पंजाब, तमिळनाडू, हिमाचल प्रदेश, हरियाणा, बडोदा, बिहार आणि राजस्थान या ८ संघांनी प्रवेश केला आहे.
यातील कर्नाटक विरुद्ध पंजाब संघातील सामन्याने २६ जानेवारीला दुपारी १२ वाजता उपांत्यपूर्व फेरीला सुरुवात होईल. त्यानंतर त्याचदिवशी संध्याकाळी ७ वाजता तमिळनाडू विरुद्ध हिमाचल प्रदेश संघात सामना होईल. २७ जानेवारीला दुपारी १२ वाजता हरियाणा विरुद्ध बडोदा हा सामना होईल. तर संध्याकाळी ७ वाजता बिहार विरुद्ध राजस्थान संघात सामना होईल.
या ४ सामन्यांतील विजयी संघ उपांत्य फेरीत प्रवेश करतील. उपांत्य फेरी देखील अहमदाबादला होणार असून २९ जानेवारीला उपांत्य फेरीचे सामने होतील. त्यानंतर ३१ जानेवारीला अंतिम सामना अहमदाबाद येथेच पार पडेल.
सय्यद मुश्ताक अली टी२० ट्रॉफी २०२१ च्या बाद फेरींचे सामने
उपांत्य पूर्व सामने –
२६ जानेवारी – कर्नाटक विरुद्ध पंजाब – दुपारी १२ वाजता, अहमदाबाद
२६ जानेवारी – तमिळनाडू विरुद्ध हिमाचल प्रदेश – संध्याकाळी ७ वाजता, अहमदाबाद
२७ जानेवारी – हरियाणा विरुद्ध बडोदा – दुपारी १२ वाजता, अहमदाबाद
२७ जानेवारी – बिहार विरुद्ध राजस्थान – संध्याकाळी ७ वाजता, अहमदाबाद
उपांत्य फेरी –
२९ जानेवारी –
पहिला सामना – दुपारी १२ वाजता, अहमदाबाद
दुसरा सामना – संध्याकाळी ७ वाजता, अहमदाबाद
अंतिम सामना –
३१ जानेवारी, संध्याकाळी ७ वाजता, अहमदाबाद
महत्त्वाच्या बातम्या –
चेन्नई सुपर किंग्सच्या ताफ्यात अनुभवी शिलेदाराची भर, केल्यात ४०००हून अधिक धावा
मैदानाबाहेरही जेंटलमॅनच! रहाणेचा कांगारूची प्रतिकृती असलेला केक कापण्यास नकार, वाचा सविस्तर
क्रिकेटपटू नाही तर ‘या’ फुटबॉलपटूने RCB संघात निवड न झाल्याने ट्विटरवर व्यक्त केली नाराजी