---Advertisement---

सईद मुश्ताक अली ट्रॉफी : सुरेश रैनाची खराब कामगिरी; सलग दुसर्‍या सामन्यात उत्तरप्रदेशचा पराभव 

---Advertisement---

भारतीय संघाचा माजी डावखुरा फलंदाज सुरेश रैना सय्यद मुश्ताक अली स्पर्धेच्या सलग दुसर्‍या सामन्यात फ्लॉप ठरला आहे. रेल्वे संघाने उत्तरप्रदेशला 8 विकेट्सने पराभूत केले. आयपीएल पूर्वी सुरेश रैनाचा हा फॉर्म चिंतेचा विषय होवू शकतो. यंदा चेन्नई सुपर किंग्ज संघ 7 ते 8 खेळाडूंना आपल्या संघातून सोडणार आहे. त्याचबरोबर या संघाने अजून सुरेश रैना बद्दल कोणताही निर्णय घेतला नाही.

आयपीएल 2020 मध्ये सुरेश रैना आयपीएलचा तेरावा हंगाम सुरू होण्यापूर्वी यूएईतून माघारी परतला होता. चेन्नई सुपर किंग्ज संघाकडून त्याला 11 कोटी रुपये मानधन दिले जाते. त्याचबरोबर या संघाने रैनाला संघात कायम ठेवायचा की नाही याचा निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे रैनाला उत्तरप्रदेश संघातून चांगली कामगिरी करून चेन्नई संघात स्थान पक्के करता येईल. पण रैना या स्पर्धेत फ्लॉप ठरताना दिसत आहे. दुसर्‍या सामन्यात सुरेश रैनाने फक्त 6 धावा केल्या

रेल्वे संघाविरुद्ध यूपी संघाला सलामी फलंदाज कर्ण शर्मा (55)आणि प्रियम गर्ग (12) चांगली सुरूवात करून दिली होती. दोन्ही फलंदाजाने यूपी संघाला 30 चेंडूत 53 धावांची भागीदारी करून दिली होती. प्रियम गर्ग बाद झाल्यानंतर तिसर्‍या क्रमांकावर सुरेश रैना फलंदाजी उतरला. 9 व्या षटकातील पहिल्या चेंडूवर चांगली फलंदाजी करणारा कर्ण शर्मा धावबाद झाला. पुढच्या चेंडूवर रैना देखील बाद झाला. रैनाने 8 चेंडूचा सामना करताना फक्त 6 धावा काढल्या. त्याच्यानंतर यूपी संघाचा कोणताच खेळाडू चांगली कामगिरी करू शकला नाही.

यूपी संघाने निर्धारित 20 षटकात 9 गडी गमावून 133 धावा केल्या. धावांचा पाठलाग करायला उतरलेल्या रेल्वे संघाकडून मृणाल देवधर (57)आणि शिवम चौधरी (56) या दोघांच्या दमदार खेळीच्या जोरावर रेल्वे संघाने 117.4 षटकात 2 गडी गमावून 137 धावा केल्या. त्यामुळे रेल्वेने हा सामना 8 विकेट्सने जिंकला. परंतु भारतीय संघासाठी एक चांगली बातमी आहे. सलग दुसर्‍या सामन्यात भुवनेश्वर कुमारने प्रभावी गोलंदाजी केली. त्याने 4 षटके गोलंदाजी करताना 21 धावा देऊन 1 विकेट घेतली.

पहिल्या सामन्यात रैनाच्या संथ खेळीने यूपी संघाचा पराभव झाला.

सुरेश रैनाने पंजाब विरुद्ध 50 चेंडूत नाबाद 56 धावांची खेळी केली. परंतु तो यूपी संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. पंजाब संघाने प्रथम फलंदाजी करताना यूपी संघाला 135 धावांचे लक्ष्य दिले होते. प्रत्युत्तरादाखल यूपी संघाने 5 गडी गमावून 123 धावा केल्या. त्यामुळे हा सामना पंजाब संघाने 11 धावांनी जिंकला.

महत्त्वाच्या बातम्या –

ज्यादा हो रहा हैं! बुमराह चौथ्या कसोटीतून बाहेर पडल्याच्या बातमीनंतर मिम्स व्हायरल

राजस्थान रॉयल्स संघातून स्टीव्ह स्मिथची होणार हकलपट्टी?

क्रिकेट इतिहासातील सर्वात कंजूस गोलंदाज, सलग २१ ओव्हर टाकल्या होत्या मेडन

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---