फिफा विश्वचषक (FIFA World Cup) 2022चा अंतिम सामना 18 डिसेंबरला खेळला जाणार आहे. कतारमध्ये सुरू असलेल्या पुरूषांच्या या 22व्या विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात फ्रांस आणि अर्जेंटिना समोरा-समोर येणार आहेत. या स्पर्धेच्या अनेक सामन्यात खेळाडूंनी पंचांच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली होती. आता या सामन्याची उत्सुकता शिगेलो पोहोचली असून अतिमहत्वाच्या या सामन्यात कोण रेफरी असणार हे समोर आले आहेत, चला तर मग जाणून घेऊ त्याबद्दल.
हा सामना लुसेल स्टेडियमवर खेळला जाणार आहे. ज्यामध्ये पोलंडचा रेफरी असणार आहे. ज्यांचे नाव सिजमॉन मार्सिनीक (Szymon Marciniak) आहे. विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात पोलंडचा रेफरी असण्याची ही पहिलीच वेळ आहे.
कोण आहेत मार्सिनीक?
मार्सिनीक यांनी या विश्वचषकात फ्रांस आणि अर्जेटिनाच्या सामन्यांमध्ये रेफरी म्हणून काम केले आहे. त्यांनी फ्रांस विरुद्ध डेन्मार्क साखळी सामना आणि सुपर 16मध्ये अर्जेंटिना विरुद्ध ऑस्ट्रेलिया या सामन्यांमध्ये रेफरीची जबाबदारी पार पाडली आहे. त्यांनी 2009मध्ये कारकिर्दीला सुरूवात केली असून 2013मध्ये त्यांना फिफाने अधिकृत रेफरी म्हणून नेमले.
मार्सिनीक यांनी ज्या दोन सामन्यात रेफरी म्हणून जबाबदारी पाहिली त्यामध्ये त्यांनी 5 यलो कार्ड दिले तर एकही रेड कार्ड किंवा पेनल्टी दिली नाही.
Szymon Marciniak of Poland will be the referee for the World Cup final. pic.twitter.com/1Cc4DePpR4
— Roy Nemer (@RoyNemer) December 15, 2022
अंतिम सामन्यात मार्सिनिक यांना पावेल सोकोल्निकी आणि टोमाज़ लिस्टकिविक्ज़ हे असिस्ट करणार आहेत. 41 वर्षीय मार्सिनिक यांना युईएफए चॅम्पियन्स लीगचा अनुभव आहे. त्यांनी मागील हंगामात लिव्हरपूल-व्हिलाररियल (Liverpool-Villarreal) यांच्यात खेळल्या गेलेल्या पहिल्या लेगच्या उपांत्य सामन्याचाही अनुभव आहे. तसेच त्यांनी 2016मध्ये झालेल्या युईएफए युरो चषकाच्या तीन सामन्यांमध्ये रेफरी म्हणून काम पाहिले आहे.
दुसरीकडे कतारचे अब्दुलरहमान अल जसिम हे तिसऱ्या स्थानासाठी होणाऱ्या सामन्यात रेफरी असणार आहेत. हा सामना मोरोक्को आणि क्रोएशिया यांच्यात शनिवारी (17 डिसेंबर) खेळला जाणार आहे. हा सामना खलिफा इंटरनॅशनल स्टेडियमवर खेळला जाणार आहे.
35 वर्षीय जसिम यांनी अमेरिका आणि वेल्स यांच्यात झालेल्या साखळी सामन्यात रेफरी होते. हा सामना 1-1 असा अनिर्णीत राहिला. त्याचबरोबर त्यांना 2019मध्ये खेळल्या गेलेल्या फिफा क्लब विश्वचषक अंतिम सामन्याचा अनुभवही आहे. हा सामना लिव्हरपूल आणि फ्लॅमेंगो यांच्यात खेळला गेला. Szymon Marciniak to referee FIFA World Cup 2022 final between France and Argentina
फ्रांस विरुद्ध अर्जेंटिना आणि मोरोक्को विरुद्ध क्रोएशिया हे दोन्ही सामने भारताच्या प्रमाणवेळेनुसार रात्री 8 वाजून 30 मिनिटांनी खेळले जाणार आहेत.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
आता काय म्हणायचं यांना! पाकिस्तानी खेळाडूचे आयपीएलबाबत खळबळजनक वक्तव्य; म्हणाला, ‘आयपीएलची गुणवत्ता…’
बांगलादेशविरुद्ध भारताची स्थिती भक्कम, दुसऱ्या डावात गिलच्या झंझावाती अर्धशतकाने संघाची आघाडी 400च्या जवळ