भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज टी नटराजन याच्यासाठी मागील काही महिने स्वप्नगत गेले आहेत. आयपीएल २०२० मध्ये सनरायझर्स हैदराबादकडून गोलंदाजी करताना त्याने प्रशंसनीय कमागिरी केली. यामुळे भारतीय संघाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर नेट गोलंदाज म्हणून त्याची निवड झाली. परंतु या दौऱ्यात एकापाठोपाठ त्याला संधी मिळत गेल्या आणि ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तिन्ही स्वरुपात पदार्पण केले. एवढेच नाही तर, पदार्पण गाजवत त्याने सर्वांची मनेही जिंकली.
यानंतर नुकताच या २९ वर्षीय खेळाडूचा नवा लूक चाहत्यांना पाहायला मिळाला आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरुन परतल्यानंतर नटराजनने मुंडन केले आहे.
नटराजन तमिळनाडू राज्यातील पलानी शहारात स्थित मुर्गन मंदिरात दर्शनासाठी गेला होता. यावेळी त्याने देवाचरणी आपल्या डोक्यावरील पूर्ण केस अर्पण केले आहेत. सोबतच त्याने दाडी आणि मिशीदेखील कापली आहे. त्याचा या नव्या लूकमधील फोटो त्याने सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोला चाहत्यांनी मोठ्या प्रणामात पसंती दर्शवली आहे.
Feeling blessed 🙏🏾 pic.twitter.com/1zKKDS8RZb
— Natarajan (@Natarajan_91) January 31, 2021
नटराजनची ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील कामगिरी
नटराजन हा आयपीएल २०२०चा भाग होता. यादरम्यान नटराजनच्या घरी चिमुकल्या परीचे आगमन झाले होते. परंतु ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाण्यासाठी आपली भारतीय संघात निवड झाल्याने नटराजन मायदेशी परतू शकला नव्हता. पुढे मनुका ओव्हल येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या तिसऱ्या सामन्यातून नटराजनने वनडे पदार्पण केले. या सामन्यात गोलंदाजी करताना त्याने २ विकेट्स घेतल्या.
त्यानंतर टी२० पदार्पण करत नटराजनने ऑस्ट्रेलियाविरुद्ध ३ टी२० सामने खेळले. यादरम्यान दमदार कामगिरी करत त्याने ६ विकेट्स चटकावल्या. एवढेच नव्हे तर, ब्रिस्बेन येथे झालेल्या चौथ्या कसोटी सामन्यात कर्णधार रहाणेने त्याची अंतिम ११ जणांच्या पथकात निवड केली. त्यामुळे कसोटी क्रिकेटमध्येही पदार्पण करत नटराजनने ४ विकेट्सची कामगिरी केली.
महत्त्वाच्या बातम्या-
भारत-इंग्लंड कसोटी मालिकेत विराट रचणार विक्रमांचा ढीग, भल्याभल्या दिग्गजांवर ठरणार वरचढ
जसप्रीत बुमराह करतोय अनिल कुंबळेप्रमाणे फिरकी गोलंदाजी, बीसीसीआयने शेअर केला व्हिडीओ
चालू सामन्यात अंपायरला शिवीगाळ करत खेळाडूने ओढवले संकट, झाला लाखोंचा दंड