कॅनबेरा। ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात शुक्रवारपासून (४ डिसेंबर) ३ सामन्यांच्या टी२० मालिकेला सुरुवात होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना मनुका ओव्हल स्टेडियमवर होणार आहे. या सामन्यातून वेगवान गोलंदाज टी नटराजन आंतरराष्ट्रीय टी२०मध्ये पदार्ण करणार आहे.
त्याला शुक्रवारी नाणेफेक होण्याआधी भारतीय संघाच्या उपस्थितीत जसप्रीत बुमराहकड़ून त्याच्या आंतरराष्ट्रीय टी२० पदार्पणाची कॅप मिळाली. या क्षणाचा व्हिडिओ बीसीसीआयने त्यांच्या ट्विटर हँडेलवर शेअर केला आहे. तो आंतरराष्ट्रीय टी२०मध्ये पदार्पण करणारा भारताचा ८३ वा खेळाडू ठरला आहे.
Onwards and upwards!
After his ODI debut, @Natarajan_91 will today play his maiden T20I game for #TeamIndia. He gets his 🧢 from @Jaspritbumrah93 #AUSvIND pic.twitter.com/hfDsw2Tycu
— BCCI (@BCCI) December 4, 2020
बुधवारी झाले होते वनडे पदार्पण –
टी नटराजनने बुधवारी(२ डिसेंबर) ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या वनडे मालिकेतील तिसऱ्या सामन्यातून वनडे पदार्पण केले होते. तो वनडे पदार्पण करणारा भारताचा २३२ वा खेळाडू ठरला होता. विशेष म्हणजे पदार्पणात त्याने सर्वांना प्रभावितही केले होते. त्याने पदार्पणाच्या सामन्यात १० षटकात ७० धावा देत २ विकेट्स घेतल्या होत्या. त्याने मार्नस लॅब्यूशाने आणि ऍश्टन एगरला बाद केले होते.