---Advertisement---

हा विश्वविजेता कर्णधार म्हणतो, ऑलिम्पिकच्या दृष्टीने हा क्रिकेटप्रकार सोयीचा

On: गुरूवार, मे 7, 2020 3:08 PM
---Advertisement---

इंग्लंडला पहिल्यांदा विश्वचषक जिंकवून देणारा कर्णधार ओएन मॉर्गनने ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश करावा असे म्हटले आहे. तो म्हणाला की, “ऑलिम्पिकमध्ये टी१० क्रिकेट व्हायला हवे. क्रिकेटचे हे स्वरुप खूप छोटे असते. त्यामुळे १० दिवसांमध्ये ही टी१० स्पर्धा संपून जाईल आणि ऑलिम्पिकच्या दृष्टीने पाहिले तर हे योग्यही ठरेल.” Eion Morgan said, T10 Cricket should included in olympics

यापुर्वी १९००ला ऑलिम्पिकमध्ये क्रिकेट खेळले गेले होते. तर, १९९८ला राष्ट्रकुलच्या खेळांमध्येही क्रिकेट स्पर्धा झाली होती. मात्र, अशा प्रकारच्या बऱ्याच मोठ्या क्रिडा स्पर्धांमध्ये क्रिकेटला सामील करण्यात येत नाही.

पण असे असले तरी २०२२मध्ये होणाऱ्या बर्मिंघम राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये महिला टी२० स्पर्धेचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे आता ऑलिम्पिकमध्येही क्रिकेटचा समावेश व्हावा असे अनेकांनी म्हटले आहे.

मॉर्गनने व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये सांगितले की, “ऑलिम्पिकसाठी टी२०, वनडे आणि कसोटीपेक्षा टी१० क्रिकेट अधिक योग्य आहे. कारण, हे क्रिकेटचे सर्वात छोटे स्वरुप आहे. ८ ते १० दिवसात संपणारी ही क्रिकेट स्पर्धा दर्शकांना खूप आकर्षित करू शकते. ऑलिम्पिक किंवा कॉमनवेल्थ गेम्ससाठी क्रिकेटचे हे स्वरुप खूप सोयीचे ठरेल.”

मॉर्गनच्या नेतृत्वाखाली इंग्लंडने २०१९सालच्या आयसीसी विश्वचषकावर पहिल्यांदा आपले नाव कोरले होते. अंतिम सामन्यातील सुपर ओव्हरमध्ये दोन्ही संघात बरोबरी झाल्यानंतर बाउंड्री काउंट नियमाच्या आधारे इंग्लंडने न्यूझीलंडला पराभूत करत विजय मिळवला होता.

ट्रेंडिंग घडामोडी-

विराट आयपीएलमधील आजपर्यंतचा सर्वात युवा कर्णधार, नावावर आहे धोनीपेक्षा खास विक्रम

टी२०मध्ये डाॅट बाॅल टाकणं नाही सोप्पं, या गोलंदाजांनी केलाय चक्रावुन…

जेव्हा हरभजन सिंग त्या गोलंदाजाला म्हणतो, भावा मी तुझ्यावर अजिबात जळतं…

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---