क्रिकेटच्या मैदानावर एकापेक्षा एक घटना पाहायला मिळतात. कधी मैदानावर चाहते सुरक्षा घेरा तोडून येतात, कधी खेळाडूंमध्ये बाचाबाची होते, तर कधी जोरात वाऱ्यामुळे सामनाही थांबवावा लागतो. यावेळीही असंच काहीसं घडलं आहे. इंग्लंडमध्ये खेळल्या जात असलेल्या टी20 ब्लास्ट स्पर्धेत एक घटना पाहायला मिळाली. फलंदाजाने इतका लांब षटकार मारला की, चेंडू थेट मैदानाजवळ असलेल्या फ्लॅटच्या बाल्कनीमध्ये गेला. सुदैवाने चेंडूमुळे महिलेला दुखापत होण्यापूर्वीच तिच्या पार्टनरने झेल घेतला.
ब्रिस्टलमध्ये पार पडला सामना
ही घटना टी20 ब्लास्ट (T20 Blast) स्पर्धेतील ग्लोस्टरशायर विरुद्ध केंट (Gloucestershire vs Kent) संघातील सामन्यात पाहायला मिळाली. हा सामना ब्रिस्टल येथे खेळला गेला. ब्रिस्टलच्या मैदानाच्या एका बाजूला अपार्टमेंट्स बनले आहेत, जिथे लोक बाल्कनीमध्ये बसून सामन्याचा आनंद लुटताना दिसतात. या सामन्याच्या 19व्या षटकात ग्लोस्टरशायर संघाने 9 विकेट्स गमावत 127 धावा केल्या होत्या. पुढील षटकात डेविड पेन (David Payne) स्ट्राईकवर होता, तर हे षटक ग्रँट स्टीवर्ट टाकत होता.
अपार्टमेंटच्या बाल्कनीत गेला षटकार
पेन याने पहिल्या चेंडूवर चौकार मारला होता. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर त्याने पूर्ण ताकदीने गगनचुंबी षटकार खेचला. हा षटकार इतक्या लांब गेला होता की, जवळच असलेल्या अपार्टमेंटच्या बाल्कनीत पोहोचला. बाल्कनीत एक महिला चाहती सामना पाहत होती. चेंडू महिलेला दुखापतग्रस्त करण्यापूर्वीच तिच्या पार्टनरने चेंडू झेलला.
David Payne nails a six which is then CAUGHT by a spectator on the balcony ????#Blast23 pic.twitter.com/BHZsSJYPA0
— Vitality Blast (@VitalityBlast) June 18, 2023
केंटने जिंकला सामना
मात्र, पेन फार काळ मैदानावर टिकू शकला नाही. तो पुढच्याच चेंडूवर 16 धावा करून बाद झाला. सामन्याविषयी बोलायचं झालं, तर प्रथम फलंदाजी करताना ग्लोस्टरशायर संघाने 20 षटकात 137 धावा केल्या होत्या. केंटने हे आव्हान 17व्या षटकातच 3 विकेट गमावत पूर्ण केले. केंटकडून डॅनियल बेल-ड्रमंड याने सर्वाधिक धााव केल्या. त्याने नाबाद 56 धावा चोपल्या. त्याच्याव्यतिरिक्त जॉर्डन कॉर्स याने नाबाद 31 धावा चोपल्या. (t20 blast batter david payne six caught by spectator on balcony see video)
महत्वाच्या बातम्या-
मियाँदादने भारताविरुद्ध पुन्हा ओकली गरळ! विधानाने 140 कोटी भारतीयांच्या तळपायाची आग जाईल मस्तकात
बिग ब्रेकिंग! आशिया चषक 2023मधील भारत-श्रीलंका सेमी फायनल मॅच रद्द, आता कधी होणार सामना?