---Advertisement---

आशिया चषक 2023मधील भारत-श्रीलंका सेमी फायनल मॅच रद्द, आता कधी होणार सामना?

Breaking
---Advertisement---

महिला इमर्जिंग आशिया चषक 2023 स्पर्धेतून मोठी बातमी समोर येत आहे. हाँगकाँग येथील टिन क्वाँग रोड रिक्रिएशन मैदानात सुरू असलेल्या स्पर्धेचा महत्त्वाचा सामना रद्द करावा लागला. भारत अ विरुद्ध श्रीलंका अ संघात खेळला जाणारा उपांत्य सामना पावसामुळे खेळवला गेला नाही. मात्र, या महत्त्वाच्या सामन्यासाठी राखीव दिवसही ठेवण्यात आला आहे. अशात हा सामना मंगळवारी (दि. 20 जून) राखीव दिवशी खेळला जाईल.

महिला इमर्जिंग आशिया चषकाविषयी मोठी अपडेट
महिला इमर्जिंग आशिया चषक 2023 (Women’s Emerging Asia Cup 2023) स्पर्धेत भारतीय संघाने अद्याप एकच सामना खेळला आहे. अशात उपांत्य सामन्यावरही पावसाने पाणी फेरले. भारतीय महिला अ (India A Women) संघाने पहिला सामना हाँगकाँगविरुद्ध खेळला होता. या सामन्यात भारतीय संघाने 9 विकेट्सने शानदार विजय मिळवला होता. तसेच, नेपाळ आणि पाकिस्तान संघांविरुद्ध होणारे सामनेही पावसामुळे रद्द झाले होते.

पहिल्या सामन्यात मोठा विजय
भारताने पहिला सामना 13 जून रोजी खेळला होता. हा सामना भारताने सहजरीत्या जिंकला होता. या सामन्यात भारतीय महिला गोलंदाज श्रेयंका पाटील (Shreyanka Patil) ही विजयाची नायिका ठरली. हा तिचा भारतीय अ महिला संघाकडून पदार्पणाचा सामना होता. यावेळी श्रेयंकाने 3 सामन्यात फक्त 3 धावा खर्च करून 5 विकेट्स घेतल्या होत्या. तिच्या या कामगिरीच्या जोरावर हाँगकाँग संघाचा डाव 34 धावांवर संपुष्टात आला होता.

भारतीय संघाने 32 चेंडूत केला खेळ खल्लास
भारतीय संघाने हे आव्हान पॉवरप्ले संपण्यापूर्वीच पार केले होते. भारतीय फलंदाजांनी हा सामना आपल्या नावावर करण्यासाठी फक्त 32 चेंडूंचा सामना केला. भारत अ संघाने हा सामना 9 विकेट्सने खिशात घातला होता. स्पर्धेचा अंतिम सामना बुधवारी (दि. 21 जून) रोजी खेळला जाईल. (big news india a vs sri lanka a semi final match is abandoned womens emerging asia cup 2023)

महत्वाच्या बातम्या-
इतिहास रचण्यासाठी झिम्बाब्वेच्या पठ्ठ्याने खेळले फक्त 70 चेंडू, नेपाळविरुद्ध नावावर केला खास विक्रम
आख्ख्या जगाने साजरा केला ‘फादर्स डे’, पण गेलकडून वडिलांना मिळालं सगळ्यात भारी गिफ्ट; एक नजर टाकाच

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---