---Advertisement---

काय कॅच आहे! पठ्ठ्याने चित्त्याची चपळाई दाखवत एका हाताने पकडला अफलातून झेल, सतत पाहिला जातोय व्हिडिओ

T20-Blast
---Advertisement---

नुकतीच इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत क्रिकेटप्रेमींना खेळाडूंकडून एकापेक्षा एक क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले. आता इंग्लंडमध्ये खेळल्या जात असलेल्या टी20 ब्लास्ट स्पर्धेतही असाच काहीसा शानदार क्षेत्ररक्षणाचा नजारा पाहायला मिळाला आहे. हा झेल पाहून बघणाऱ्यालाही त्याच्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही. चला तर खेळाडूने नेमका कसा झेल पकडला आहे, ते जाणून घेऊयात…

टी20 ब्लास्ट (T20 Blast) स्पर्धेत मंगळवारी (दि. 30 मे) ग्लॉस्टरशायर विरुद्ध एसेक्स संघ आमने सामने होते. या सामन्यात पाकिस्तानचा गोलंदाज जफर गौहर (Zafar Gohar) याने जबरदस्त क्षेत्ररक्षण करत क्रिकेटप्रेमींना दाताखाली बोटे दाबण्यास भाग पाडले. जफर इंग्लंडमध्ये ग्लॉस्टरशायर संघाकडून खेळत आहे. मंगळवारी त्याने चेम्सफोर्डच्या काऊंट क्रिकेट मैदानावर एसेक्स संघाविरुद्ध टी20 ब्लास्टमधील या सामन्यात धमाकेदार क्षेत्ररणक्षण केले.

गौहरने फिराज खुशीला केले बाद
जफरने एसेक्स संघाचा सलामीवीर फिरोज खुशी याला बाद करण्यासाठी शॉर्ट थर्डवर हवेत डाईव्ह मारली आणि डाव्या हाताने शानदार झेल पकडला. त्याचा हा झेल इतका शानदार होता की, पाहून एका क्षणात डोळ्यांवर विश्वास ठेवणेही कठीण झाले. जफरचे क्षेत्ररक्षण पाहून प्रत्येकाच्या भुवया उंचावल्या. त्याच्या झेलाचा व्हिडिओ त्याने आणि टी20 ब्लास्टने अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून शेअर केला आहे. जफरने आपल्या संघसहकारी पाकिस्तानी अष्टपैलू शादाब खान आणि मोहम्मद नवाज यांना टॅग करत लिहिले की, “हा खूपच सोपा होता.”

एसेक्सचा दणदणीत विजय
ग्लॉस्टरशायर संघाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकात 7 विकेट्स गमावत 195 धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना एकेक्स संघाने 19.1 षटकात 7 विकेट्स गमावत 196 धावा केल्या. हा सामना एसेक्स संघाने 5 चेंडू शिल्लक ठेवून 3 विकेट्सने खिशात घातला. एसेक्सकडून या सामन्यात रॉबिन दास याने 33 चेंडूत 11 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 69 धावा कुटल्या. फिरोजने 14 चेंडूत 2 चौकार आणि 3 चौकारांच्या मदतीने 34 धावा केल्या होत्या. (t20 blast cricketer zafar gohar caught amazing catch with one hand see video)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
IPL फायनलमधील धोनीचा ‘हा’ भावूक करणारा व्हिडिओ पाहून तुमचेही डोळे पाणावतील, जोरदार होतोय व्हायरल
WTC फायनलपूर्वीच कांगारुंना वाटतेय विराट-पुजाराची भीती! चेतावणी देत पाँटिंग म्हणाला, ‘लवकर विकेट…’

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---