ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी20 विश्वचषकाची अंतिम फेरी जवळ येत आहे. सर्व क्रिकेटप्रेमी या विश्वचषकाचा विजेता कोण होणार याकडे डोळे लावून आहेत. संपूर्ण क्रिकेटविश्व या विश्वचषकाची मजा घेत असताना, ऑस्ट्रेलियाचा माजी कसोटी कर्णधार टीम पेन याने टी20 क्रिकेटबद्दल एक वादग्रस्त विधान केले आहे.
ऑस्ट्रेलियाच्या कसोटी संघाचे नेतृत्व केलेल्या पेन यांनी एका मुलाखतीत नुकतेच टी20 क्रिकेटविषयी आपली प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला,
“मोठ्या प्रमाणावर आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेट खेळणे फारसे फायद्याचे नाही. सध्या जवळपास सर्व देशांमध्ये फ्रॅंचायजी क्रिकेट खेळले जात आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेट खेळणे अर्थहीन वाटते. त्यामुळे पाहणाऱ्या प्रेक्षकांना देखील तितकी मजा येत नाही.”
तो पुढे बोलताना म्हणाला,
“माझ्याकडे टी20 क्रिकेटबाबत एक योजना आहे. जगभरात सर्व खेळाडू असेही टी20 क्रिकेट खेळतात. आंतरराष्ट्रीय टी20 चे सामने कमी करून, दर चार वर्षांनी टी20 विश्वचषक आयोजित केला जावा. यावर्षी आपल्याला स्पष्टपणे दिसून आले आहे की, विश्वचषकाचे सराव सामने असो अथवा काही महत्त्वाचे सामने असो ज्याकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली आहे.”
ऑस्ट्रेलियात होत असलेल्या या स्पर्धेत यजमान ऑस्ट्रेलिया संघालाच उपांत्य फेरी गाठता आली नाही. तसेच ते या स्पर्धेचे यजमान देखील होते. दुसरीकडे टीम पेन याला यावर्षी ऑस्ट्रेलियाच्या कसोटी संघाचे नेतृत्व सोडावे लागले होते. तसेच तो संघाचा भाग देखील नाही. 2017 मध्ये झालेल्या सॅंडपेपर प्रकरणानंतर त्याच्याकडे ऑस्ट्रेलियन कसोटी संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले होते. मात्र, यादरम्यान ऑस्ट्रेलिया संघाला तितकी भरीव कामगिरी करता आली नाही.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
सूर्याचे कौतुक करताना इंग्लिश कर्णधाराने वापरले हे शब्द; म्हणाला…
‘आम्ही मेलबर्नमध्ये तुमची वाट बघतोय’; टीम इंडियाला पाकिस्तानी दिग्गजाचे ओपन चॅलेंज