---Advertisement---

सूर्याचे कौतुक करताना इंग्लिश कर्णधाराने वापरले हे शब्द; म्हणाला…

On: बुधवार, नोव्हेंबर 9, 2022 9:35 PM
Suryakumar-Yadav
---Advertisement---

ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी20 विश्वचषकात गुरुवारी (10 नोव्हेंबर) दुसरा उपांत्य सामना खेळला जाईल. या सामन्यात भारतीय संघ इंग्लंडचे आव्हान स्वीकारेल. हा सामना ऍडलेड ओव्हल येथे खेळला जाईल.‌ या सामन्याच्या पूर्वसंध्येला इंग्लंड संघाचा कर्णधार जोस बटलर हा पत्रकारांना सामोरा गेला. त्याने या पत्रकार परिषदेत भारतीय संघाचा प्रमुख फलंदाज सूर्यकुमार यादव याचे तोंडभरून कौतुक केले.

सामन्याच्या पूर्वसंध्येला झालेल्या पत्रकार परिषदेत जोस बटलर याने अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर आपले मत दिले. त्याने भारतीय संघाचा प्रमुख फलंदाज सूर्यकुमार यादव याच्याबाबत बोलताना म्हटले,

“सूर्याने आत्तापर्यंत स्पर्धेत तुफान कामगिरी केली. त्याला मी आतापर्यंत स्पर्धेतील सर्वोत्तम फलंदाज म्हणू शकतो. त्याची सर्वात मोठी ताकद म्हणजे तो एकदम खुलून खेळतोय. तसेच तो दबावाचा देखील चांगल्या प्रकारे सामना करतो. तो स्वतःलाच स्वतःचे सर्व फटके खेळण्याची संधी देताना दिसतोय. मात्र, जगातील कोणत्याही फलंदाजाला बाद करण्याची केवळ एक संधी मिळायला हवी. सूर्याच्या बाबतीतही आम्ही त्या संधीची वाट पाहू. केवळ सूर्याच नव्हेतर भारतीय संघात इतरही तशाच पद्धतीचे तगडे फलंदाज आहेत.”

सूर्यकुमार यादव या विश्वचषकात अक्षरशः धावांचा रतीब घालत आहे. त्याने सुपर 12 फेरीत खेळलेल्या 5 सामन्यात 193.96 च्या स्ट्राईक रेटने 225 धावा चोपल्या आहेत. स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंमध्ये त्याचा तिसरा क्रमांक आहे. विशेष म्हणजे त्याने या संपूर्ण वर्षात 1000 आंतरराष्ट्रीय टी20 धावांचा पल्ला देखील गाठला. तो सध्या टी20 फलंदाजांच्या क्रमवारीत अव्वलस्थानी विराजमान आहे.

उपांत्य सामन्यासाठी भारताची संभाव्य प्लेईंग इलेव्हन-

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, अर्शदीप सिंग,‌‌ भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी.

(Jos Buttler Praised Suryakumar Yadav Before Semi Final)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
बाबर अन् रिझवानने भल्याभल्यांना दाखवली आपली ताकद, टी20 विश्वचषकाच्या ‘या’ विक्रमात बनलेत टेबल टॉपर
अर्रर्र! पंचांनी एकाच फलंदाजाला 2 चेंडूंवर दोन वेळा दिले आऊट, पण असं घडलं तरी कसं?

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---