आयसीसी टी20 विश्वचषकात (ICC T20 World Cup) 11वा सामना अमेरिका विरुद्ध पाकिस्तान यांच्यामध्ये खेळला गेला. हा सामना ग्रँड पेरी स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात अमेरिकेनं टाॅस जिंकून पाकिस्तानला फलंदाजीसाठी पाचरण केलं होतं. यादरम्यानं पाकिस्ताननं मर्यादित 20 षटकांमध्ये 7 विकेट्स गमावून 159 धावा केल्या आणि अमेरिकेसमोर 160 धावांच आव्हान ठेवलं होतं. तत्पूर्वी या सामन्यात पाकिस्तान संघाचा कर्णधार बाबर आझमनं भारतीय संघाचा दिग्गज खेळाडू विराट कोहलीचं (Virat Kohli) रेकाॅर्ड मोडित काढलं.
बाबर आझमनं (Babar Azam) या सामन्यात फलंदाजी करताना 43 चेंडूत 44 धावा केल्या. यादरम्यान त्यानं 3 चौकारांसह 2 उत्तुंग षटकार ठोकले आणि टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा जगातील पहिला खेळाडू ठरला. बाबरनं 120 टी20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. यामध्ये त्यानं 41.08च्या सरासरीनं 4067 धावा ठोकून भारतीय संघाच्या दिग्गज खेळाडूचा विक्रम मोडित काढला.
विराट कोहलीच्या (Virat Kohli) टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 118 सामन्यात 4038 धावा ठोकल्या आहेत. यादरम्यान त्याचा स्ट्राईक रेट 137.96 राहिला आहे. तर यामध्ये त्यानं 1 शतकासह 37 अर्धशतक ठोकले आहेत आणि आता कोहलीची टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या यादीत एका स्थानानं घसरण झाली आहे. कारण पाकिस्तान कर्णधार बाबर आझमनं दुसऱ्या स्थानावरुन सर्वाधिक धावा करण्याच्या यादीत मुसंडी मारली आहे.
बाबर आझम आणि विराट कोहली सध्या दोघंही खेळाडू टी20 विश्वचषक स्पर्धेत खेळत आहेत आणि दोघांच्या धावांमध्ये फारसा फरक नाही त्यामुळे यंदाच्या टी20 विश्वचषकात टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या यादीत वरचढ राहणार आहे. विराट कोहली टी20 विश्वचषकाच्या पहिल्या सामन्यात खास प्रदर्शन करु शकला नाही. एका धावेवरती तो तंबूत परतला. परंतु आयपीएलमध्ये त्याचा फाॅर्म जोरदार राहिला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
पाकिस्ताननं अमेरिकेसमोर ठेवलं 160 धावांचं लक्ष्य!
पाकिस्तानच्या माजी कर्णधारानं केलं, भारतीय संघाबद्दल मोठं वक्तव्य!
अमेरिकेनं जिंकला टाॅस; प्रथम गोलंदाजीचा निर्णय, जाणून घ्या दोन्ही संघांच्या प्लेइंग 11