टी20 विश्वचषक (T20 World Cup) 2022 ऑस्ट्रेलियात सुरू आहे. यामध्ये अनेकांनी उत्तम कामगिरी केली मग तो फलंदाज असो वा गोलंदाज. त्यांच्या या कामगिरीचा परिणाम आयसीसीने जाहीर केलेल्या क्रमवारीत दिसून आला आहे. भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली आशिया चषक 2022च्या आधी आऊट ऑफ फॉर्म होता, यामुळे तो कारकिर्दीत पहिल्यांदाच आयसीसी टी20 क्रमवारीच्या पहिल्या दहामधून बाहेर झाला होता. पाकिस्तानविरुद्ध केलेल्या नाबाद 82 धावाने त्याला क्रमवारीत मोठा फायदा झाल्याचे दिसले आहे.
आयसीसीने बुधवारी (26 ऑक्टोबर) पुरूषांची टी20 क्रमवारी जाहीर केली. फलंदाजीमध्ये भारताच्या काही खेळाडूंना लाभ झाला तर पाकिस्तानच्या खेळाडूंना नुकसान झाले आहे. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम (Babar Azam) भारताविरुद्ध शून्य धावा करत तंबूत परतला आणि त्याची टी20 क्रमवारी घसरली. तसेच मैदानात आता नव्या खेळाडूने दुसरे स्थान काबीज केले आहे. हे करताना त्याने बाबर-सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) यांना मागे टाकले आहे.
सूर्यकुमारने पाकिस्तानविरुद्ध खास काही कामगिरी केली नाही. यामुळे तो तिसऱ्या स्थानावर आला आहे. मोहम्मद रिझवान (Mohammad Rizwan) अव्वल स्थानावर कायम आहे, तर न्यूझीलंडचा डेवॉन कॉनवे (Devon Conway)
याने बाबर आणि सूर्यकुमारला मागे टाकले आहे. कॉनवे दुसऱ्या स्थानावर आला आहे. त्याने टी20 विश्वचषकाच्या पहिल्या सुपर 12मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध नाबाद 92 धावा केल्या होत्या. बाबर आता चौथ्या स्थानावर आला आहे.
Virat Kohli on the rise 👊
The Indian star's sensational innings against Pakistan sees him surge up in the latest @MRFWorldwide ICC Men's T20I Player Rankings 📈
Details ⬇https://t.co/Up2Id40ri0
— ICC (@ICC) October 26, 2022
आयसीसी टी20 फलंदाजांच्या क्रमवारीच्या पहिल्या दहामध्ये विराट-सूर्या हे दोनच भारतीय खेळाडू आहेत. विराट नवव्या स्थानावर पोहोचला आहे. पाचव्या स्थानावर दक्षिण आफ्रिकेचा एडन मार्क्रम आहे. भारताचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) 16व्या स्थानावर असून केएल राहुल 18व्या स्थानावर आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
अरे बापरे, दिनेश कार्तिकच्या वडिलांकडून ऑस्ट्रेलियात नियमाचे उल्लंघन! वाचा सविस्तर
मेलबर्नमध्ये पहिल्यांदाच खेळणाऱ्या आयर्लंडचा इंग्लंडला धक्का, सामना 5 धावांनी टाकला खिशात