ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी20 विश्वचषकातील पहिल्या उपांत्य सामन्यात न्यूझीलंड व पाकिस्तान (NZvPAK) हे संघ आमने-सामने आले. या सामन्यात प्रथम फलंदाजीची संधी मिळालेल्या न्यूझीलंडने खराब सुरुवातीनंतर सामन्यात पुनरागमन करत निर्धारित 20 षटकात 3 बाद 152 धावसंख्या चौथ्या क्रमांकावरील फलंदाज डॅरिल मिचेलने झळकावलेले अर्धशतक न्यूझीलंडच्या डावाचे वैशिष्ट्य ठरले.
अ गटातून अव्वल स्थानी राहिलेला न्यूझीलंड व ब गटातील दुसऱ्या क्रमांकाचा संघ असलेल्या पाकिस्तान यांच्यातील हा सामना सिडनी येथील सिडनी क्रिकेट ग्राउंडवर खेळला गेला. न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र, त्यांचा हा निर्णय चुकीचा ठरला व फिन ऍलन याला शाहीनशहा आफ्रिदी याने पहिल्या शतकात बाद केले. दुसरा सलामीवीर डेवॉन कॉनवे हा देखील फारसे योगदान देऊ शकला नाही. त्याने संघर्षपूर्ण 21 धावा केल्या. त्यानंतर कर्णधार केन विल्यमसन व डॅरिल मिचेल यांनी न्यूझीलंडचा डाव सावरला. विलियम्सनने 42 चेंडूत 46 धावा काढत न्यूझीलंडला सामन्यात पुनरागमन करून दिले
मागील विश्वचषकाच्या उपांत्य सामन्यातही शानदार अर्धशतकी खेळी करणाऱ्या डॅरिल मिचेलने 35 चेंडूंवर 53 धावा कुटल्या. तर निशामनेही नाबाद 16 धावांचे योगदान दिले. पाकिस्तानसाठी आफ्रिदीने सर्वाधिक दोन बळी मिळवले. (t20 wc 2022 semi final New Zealand set Pakistan a target of 153 runs to win.)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
कर्णधार रोहितची मोठी हिंट! सांगूनच टाकलं, पंत अन् कार्तिकपैकी इंग्लंडविरुद्ध कोणाला उतरवणार
अरे हे काय, ऍडलेड ओव्हलच्या सेमीफायनलमध्ये नाणेफेक ‘हरण्यासाठी’ रोहित-जोसमध्ये चढाओढ! कारणच चकित करणारे






