---Advertisement---

T20 WC 2026: भारत आणि इंग्लंडला जे जमले नाही ते स्कॉटलंडने करून दाखवले; मुन्से-जोन्स जोडीची ऐतिहासिक कामगिरी

On: सोमवार, फेब्रुवारी 9, 2026 5:20 PM
---Advertisement---

​टी-२० विश्वचषक २०२६ च्या सातव्या सामन्यात स्कॉटलंडने इटलीचा ७३ धावांनी पराभव केला. स्कॉटलंडच्या फलंदाजांनंतर संघाच्या गोलंदाजांनीही जबरदस्त कामगिरी केली. स्कॉटलंडने दिलेल्या २०८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना इटलीचा संपूर्ण संघ अवघ्या १३४ धावांत गारद झाला.

​यापूर्वी, स्कॉटलंड टी-२० विश्वचषक २०२६ मध्ये २०० धावांचा टप्पा ओलांडणारा पहिला संघ ठरला. संघाकडून जॉर्ज मुन्से याने शानदार फलंदाजी करत ५४ चेंडूत ८४ धावांची झंझावाती खेळी केली. आपल्या या खेळीदरम्यान मुन्सेने १३ चौकार आणि २ षटकार ठोकले. दुसरीकडे, मायकेल जोन्स याने ३० चेंडूत ३७ धावांची खेळी केली. या दोघांनी मिळून पहिल्या विकेटसाठी १२६ धावांची भागीदारी रचली. सहयोगी (Associate) देशांमधील ही आतापर्यंतची सर्वात मोठी सलामीची भागीदारी ठरली आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---