रविवार म्हणजेच 16 ऑक्टोबर रोजी आयसीसी टी-20 विश्वचषक 2022 सुरू झाला. या हंगामातील पहिल्याच सामन्यात श्रीलंकन संघाला नामिबियाविरुद्ध 55 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. मंगळवारी विश्वचषक स्पर्धेतील सहावा आणि श्रीलंकंन संघाने त्यांचा दुसरा सामना खेळला. या सामन्यात त्यांच्यासमोर यूएई संघाचे आव्हान होते. या सामन्यात श्रीलंकेसाठी सलामीवीर फलंदाज पथुम निसांका याने मोठी खेळी केली. निसांकाचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो चौकार मारताना खाली पडतो.
पथुम निसांका (Pathum Nisanka) या सामन्यात श्रीलंकन संघासाठी सर्वात मोठी खेळी करणारा फलंदाज ठरला. त्याने या सामन्यात 60 चेंडू खेळले आणि 74 धावा केल्या. सहा चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने त्याने या धावा केल्या. यादरम्यान 18 व्या षटकात निसांका चौकार मारण्याच्या प्रयत्नात खाली पडला. आयसीसीच्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावरून हा व्हिडिओ शेअर केला आहे. चौकार मारण्याच्या प्रयत्नात निसांका खेळी पडलाच, पण त्याच्या पायातील शूज देखील निघाला. असे असले तरी, खाली पडण्याआधी चेंडू त्याच्या बॅटवर चांगल्या प्रकारे आला होता आणि सीमारेषेपार जाण्याइतपत या शॉटमध्ये ताकत होती. श्रीलंकन संघाला या चेंडूवर चार धावा मिळाल्या. व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल देखील होत आहे. जोहर खान या षटकात गोलंदाजाची भूमिका पार पाडत होता.
https://www.instagram.com/reel/Cj2amLSu6io/?utm_source=ig_web_copy_link
दरम्यान, उभय संघांतील या सामन्याचा विचार केला तर, नाणेफेक गमावल्यानंतर श्रीलंकन संघाला प्रथम फलंदाजी करावी लागली. प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतल्यानंतर यूएई संघ श्रीलंकेला 20 षटकांमध्ये 8 विकेट्सच्या नुकसानावर 152 धावांवर रोखू शकला. पथून निसांकाकने खेकेल्या प्रदर्शनासाठी त्याला सामनावीर निवडले गेले. धनंजया डी सिल्वा या सामन्यात श्रीलंकेसाठी दुसरा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. त्याने 21 चेंडूत 33 धावा केल्या. यूएईच्या कार्थिक माईयाप्पनने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. त्याने टाकलेल्या 4 षटकांमध्ये 19 धावा खर्च करून ही कामगिरी केली. तसेज जहूर खानने 4 षटकात 26 धावा खर्च करून 2 विकेट्स घेतल्या. श्रीलंकन गोलंदाजांनी यूएईला स्वस्तःत गुंडाळले. यूएईने 17.1 षटकात 73 धावा केल्या आणि संघ सर्वबाद झाला. दुष्मंथा चमिरा आणि वानिंदु हसरंगाने प्रत्येकी तीन-तीन विकेट्स घेतल्या.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
फर्ग्युसन कॉलेज विजयेंद्र कुलकर्णी मेमोरियल टेनिस स्पर्धेत भक्ती ताजने, स्वानिका रॉय, श्रावणी देशमुख यांची आगेकूच
मुलाच्या सिलेक्शनची वेळ आली तेव्हा बीसीसीआयचे नवे अध्यक्ष मिटींगमधून गेले होते बाहेर