महिला टी२० वर्ल्डकप: टीम इंडियाला मोठा धक्का; सांगलीकर स्म्रीती मंधना दुखापतग्रस्त

आजपासून (21 फेब्रुवारी) ऑस्ट्रेलिया येथे महिला टी20 विश्वचषकाला सुरुवात झाली आहे. या विश्वचषकातील पहिला सामना भारतीय महिला संघ आणि ऑस्ट्रेलिया महिला संघात सिडनी येथे सुरु आहे. हा सामना सुरु असतानाच भारताला मोठा धक्का बसला आहे.

भारताची स्टार फलंदाज स्म्रीती मंधना दुखापतग्रस्त झाली आहे. या सामन्यात भारताने दिलेल्या 133 धांवांच्या आव्हानाचा ऑस्ट्रेलियाकडून पाठलाग करत असताना एलिसा हेलीने पहिल्याच षटकाच्या पाचव्या चेंडूवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. यावेळी मंधनाच्या डाव्या खांद्याला चौकार आडवण्याच्या नादात दुखापत झाली. पण चौकार आडवला गेला.

मंधना चौकार आडवताना बाऊंड्री लाईनच्या बाहेर असणारा जाहिरातीच्या होर्डिंग्जला धडकली. त्याचवेळी तिच्या डाव्या खांद्याला मार लागला. त्यानंतर लगेचच तिच्यावर भारताच्या वैद्यकीय पथकाने उपचार केले. परंतू त्यानंतर ती मैदानाबाहेर गेली. परंतू अजून तिची दुखापत कितपत गंभीर आहे, याबद्दल अजून बीसीसीआयने माहिती दिलेली नाही.

या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलिया विरुद्ध प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 4 बाद 132 धावा केल्या आहेत. भारताकडून दिप्ती शर्माने सर्वाधिक नाबाद 49 धावा केल्या. तसेच 16 वर्षीय शेफाली वर्माने 15 चेंडूत आक्रमक फटकेबाजी करत 29 धावा केल्या. तर रोड्रीगेजने 26 धावांची खेळी केली. मात्र मंधनाला आज खास काही करता आले नाही. ती 10 धावांवर बाद झाली.

You might also like