नुकतीच टी२० विश्वचषक २०२१ ची सुरुवात झाली आहे. सोमवार रोजी (१८ ऑक्टोबर) टी२० विश्वचषकातील तिसरा सामना आयर्लंड विरुद्ध नेदरलँड यांच्यात होणार आहे. अबु धाबीच्या शेख झायेद स्टेडियमवर रंगणारा हा सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी ३.३० वाजता सुरू होईल. उभयंतांमध्ये झालेल्या शेवटच्या लढतीत नेदरलँडच्या खेळाडूंनी अप्रतिम खेळ दाखवत आयर्लंडवर २१ धावांनी विजय मिळवला होता.
अशात सोमवारी होणाऱ्या लढतीत नेदरलँड आपली ही विजयी लय कायम राखण्याच्या प्रयत्नात असेल. तर आयर्लंड मागील पराभवाचा वचपा काढण्यासाठी प्रयत्नशील असेल.
तत्पूर्वी आम्ही तुमच्यासाठी या दोन्ही संघांतील सर्वोत्कृष्ट ११ खेळाडूंचा अंदाज घेऊन आलो आहोत. चला तर पाहूया, कसा असू शकतो आयर्लंड विरुद्ध नेदरलँडचा ड्रीम ११ संघ
सामन्याविषयी अधिक माहिती-
सामना: आयर्लंड विरुद्ध नेदरलँड, गट अ, सामना ३
स्थळ: शेख जायद क्रिकेट स्टेडियम, अबू धाबी
तारीख आणि वेळ: १८ ऑक्टोबर २०२१, दुपारी ३.३० वाजता
लाईव्ह स्ट्रिमिंग: स्टार स्पोर्ट्स नेटवर्क
आयर्लंड विरुद्ध नेदरलँडची संभाव्य प्लेइंग इलेव्हन:
आयर्लंड:
लॉर्कन टकर, पॉल स्टर्लिंग, अँडी बालबर्नी, गॅरेथ डेलानी, केविन ओब्रायन, सिमी सिंग, कर्टिस कॅम्फर, जॉर्ज डॉकरेल, मार्क अडायर, क्रेग यंग, अँडी मॅकब्राइन
नेदरलँड:
स्कॉट एडवर्ड्स, बेन कूपर, मॅक्स ओ’डॉड, स्टीफन मायबर्ग, रीलोफ व्हॅन डेर मर्वे, पीटर सीलार, कॉलिन एकरमॅन, रायन टेन डॉशेट, पॉल वान मीकेरेन, टिम व्हॅन डेर गुग्टेन, लोगान वान बीक
ड्रीम ११ टीम
फलंदाज
पॉल स्टर्लिंग- हा आयर्लंडच्या सर्वोत्कृष्ट फलंदाजांपैकी एक आहे. त्याने आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये ८९ सामन्यात २४९५ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याचा स्ट्राईक रेट १३७.१६ इतका राहिला आहे.
बेन कूपर- नेदरलँड संघाचा मधल्या फळीतील फलंदाज बेन कूपर याची टी२० क्रिकेटमधील सरासरी उल्लेखनीय राहिली आहे. त्याने ५६ टी२० सामन्यांमध्ये ३० च्या सरासरीने १२३० धावा केल्या आहेत.
अष्टपैलू-
जॉर्ज डॉक्रेल- हा आयर्लंडचा अनुभवी अष्टपैलू क्रिकेटपटू आहे. त्याने आतापर्यंत ८६ टी२० सामने खेळताना ७६ विकेट्स आणि ३६३ धावांची कामगिरी केली आहे.
रिलोफ वॅन डेर मर्व- नेदरलँडच्या या डावखुऱ्या अष्टपैलूची निवड अगदी योग्य ठरेल. ४३ टी२० सामन्यांमध्ये ५४ विकेट्स आणि ४५४ धावा अशी त्याची कामगिरी राहिली आहे.
गोलंदाज-
मार्क ऐदर- हा आयर्लंडच्या गोलंदाजी फळीचे नेतृत्त्व करेल. त्याने २६ आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यांमध्ये ४५ विकेट्स चटकावल्या आहेत.
टीम वॅन डेर गटन- नेदरलँडचा हा गोलंदाज आयर्लंडविरुद्ध प्रभावी ठरू शकतो. त्याने आतापर्यंत टी२० क्रिकेटमध्ये ४० विकेट्स घेतल्या आहेत.
यष्टीरक्षक-
स्कॉट एडवर्ड्स- हा तुमच्या पहिल्या पसंतीचा यष्टीरक्षक फलंदाज ठरू शकतो. त्याने आतापर्यंत ३३ टी२० सामन्यांमध्ये २३ च्या सरासरीने ४०२ धावा केल्या आहेत.
आयर्लंड वि. नेदरलँडची ड्रीम ११:
स्कॉट एडवर्ड्स (यष्टीरक्षक), पॉल स्टर्लिंग (कर्णधार), बेन कूपर, अँडी बालबर्नी, रुलोफ व्हॅन डेर मर्वे (उपकर्णधार), जॉर्ज डॉकरेल, सिमी सिंग, रायन टेन डॉशेट, क्रेग यंग, लोगान व्हॅन बीक, मार्क अडायर
महत्त्वाच्या बातम्या-
टी२० विश्वचषकाच्या पहिल्याच सामन्यात ओमानचा मोठा विजय; पीएनजीला १० विकेट्सने केलं पराभूत
टी २० विश्वचषकाच्या पहिल्याच दिवशी धक्कादायक निकालाची नोंद, बांगलादेश स्कॉटलंडकडून पराभूत