---Advertisement---

अफगाणिस्तानी चाहत्यांचा धुमाकूळ! तिकीट नसतानाही स्टेडियममध्ये घुसण्याचा प्रयत्न, आयसीसीने घेतली दखल

On: शनिवार, ऑक्टोबर 30, 2021 8:55 PM
---Advertisement---

आयसीसी टी-२० विश्वचषकातील २४ वा सामना शुक्रवारी (२९ ऑक्टोबर) दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर पार पडला. या सामन्यात पाकिस्तान आणि अफगाणिस्तान हो दोन संघ एकमेकांसोबत भिडले. या सामन्यात पाकिस्तानने पाच विकेट्स राखून अफगाणिस्तानला पराभवाची धुळ चारली. दरम्यान, अफगाणिस्तान संघाच्या चाहत्यांमुळे सामन्यात अडथळा आल्याचे समोर आले आहे. अफगाणिस्तान चाहत्यांच्या एका मोठ्या समूहाने सामना पाहण्यासाठी जबरदस्ती स्टेडियममध्ये घुसण्याचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे.

अफगाणिस्तानच्या या चाहत्यांच्या समूहाकडे सामना पाहण्यासाठी तिकीट नव्हते, तरी देखील त्यांनी स्टेडियममध्ये घुसण्याचा प्रयत्न केला आहे. या घटनेनंतर आयसीसीने याची दखल घेतल्याचे दिसत आहे आणि घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. आयसीसीने अमीरात क्रिकेट बोर्डला (ईसीबी) अफगाणिस्तान समर्थकांच्या या समूहाविषयी चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

पाकिस्तान आणि अफगाणिस्तान सामन्यासाठी १६००० तिकीटांची विक्री केली गेली होती, पण याव्यतिरिक्त तिकीट नसतानाही हजारो प्रेक्षक सामना पाहण्यासाठी मैदानात घुसले होते, असे सांगितले जात आहे. तिकिट नसतानाही स्टेडियममध्ये घुसलेल्या या प्रेक्षकांमुळे तिकीट खरेदी केलेल्या काहींना स्टेडियममध्ये प्रवेश मिळाला नाही. आयसीसीने ज्या तिकीटधारकांना सामना पाहता आला नाही, त्यांचीही माफी मागितली आहे.

आयसीसीने या घटनेची गंभीरतेने दखल घेतली आहे. यानंतर आयसीसीने संपूर्ण घटनेची स्पष्टीकरण दिले आहे. आयसीसीने सांगितले की, “दुबई पोलीस आणि सुरक्षा स्टाफने अतिरिक्त बल तैनात केरून गर्दीला पांगवले आणि स्थिती नियंत्रणात आणली. जवळपास सात वाजता दुबई पोलीसांना सर्व दरवाजे बंद करण्याचा आणि कोणालाच प्रवेश न देण्याचे निर्देश दिले होते. जेणेकरून स्टेडियमच्या आतमधील स्थिती नियंत्रणात राहील.”

अयसीसीने पुढे सांगितले की, “आयसीसी, बीबीसीआय आणि ईसीबी त्या प्रेक्षकांची माफी मागू इच्छित आहे, जे तिकीट असूनही आतमध्ये येऊ शकले नाहीत. त्यांना विनंती आहे की, त्यांनी संपर्क करावा.”

महत्त्वाच्या बातम्या – 

अफगाणिस्तानचा पराभव केल्यानंतर शोएब मलिकचा शाहिद अफ्रिदीला कडक सॅल्यूट, पाहा व्हिडिओ

क्या बात है! पाकिस्तानी फलंदाजाने करून दिली १५ वर्षे जुन्या एमएस धोनीची आठवण; कसं ते घ्या जाणून

न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यापूर्वी भारतीय खेळाडूंनी घेतला बीचवर वॉलीबॉल खेळण्याचा आनंद, पाहा व्हिडिओ

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---