पाकिस्तान संघाचे टी-२० विश्वचषकातील उत्कृष्ट प्रदर्शन चालूच आहे. शुक्रवारी(२९ ऑक्टोबर) पाकिस्तान संघ अफगाणिस्तान संघासोबत भिडला होता. पाकिस्तानने या सामन्यातही त्यांची विजयी घोडदौड कायम राखली आहे. पाकिस्तानने हा सामना पाच विकेट्स आणि सहा चेंडू राखून जिंकला. टी२० विश्वचषकात पाकिस्तानचा हा सलग तिसरा विजय असून गुणतालिकेत संघ ग्रुप दोनमध्ये सहा गुणांसह पहिल्या स्थानावर आहे. दरम्यान, पाकिस्तानने अफगाणिस्तान संघावर मिळवलेल्या विजयानंतर शोएब मलिक आणि शाहिद अफ्रिदी हे दोन्ही दिग्गज खेळाडू आनंदात दिसले आहेत.
पाकिस्तान संघाचा माजी कर्णधार आणि महान अष्टपैलू खेळाडू शाहिद अफ्रिदी या सामन्याचा आनंद घेण्यासाठी मैदानात उपस्थित होता. अफ्रिदी मैदानाच्या स्टँडमध्ये सामन्याचा आनंद घेत होता. सामना संपल्यानंतर दिग्गज शोएब मलिक आनंदी होता आणि ड्रेसिंग रूमच्या दिशेने चालला होता. अशातच त्याची नजर स्टँडमध्ये उपस्थित असलेल्या शाहिद अफ्रिदिकडे गेली. अफ्रिदीला स्टँडमध्ये पाहून शोएब त्याच्या दिशेने गेला आणि त्याला सल्यूट केला. त्यानंतर अफ्रिदीनेही त्याने केलेल्या सल्यूटला प्रत्युत्तर दिले आहे.
Moment of the Day
Shoaib Malik comes and Salute to Superstar Shahid Afridi
Malik: mere murshad #PakvsAfg #T20WorldCup21 pic.twitter.com/PNOYw10eXW— Malik A Haseeb (@MalikAHaseeb) October 29, 2021
https://twitter.com/thoraparhlein/status/1454152823499857920
दरम्यान, सामन्यात सुरुवातीला अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकली. प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तानने २० षटकात ६ विकेट्सच्या नुकसानावर १४७ धावा केल्या. प्रत्युत्तरात पाकिस्तानने हे लक्ष्य १९ षटकांमध्ये आणि पाच विकेट्सच्या नुकसानावर गाठले. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आजमने या सामन्यात महत्वाची अर्धशतकी खेळी केली. तसेच पाकिस्तानसाठी आसिफ अलीने सात चेंडूत २५ धावांच्या जबरदस्त खेळी करून पाकिस्तानला विजय मिळवून दिला.
पाकिस्तानने विश्वचषकातील त्याचे पहिले तिन्ही सामने जिंकले आहेत. त्यांनी पहिल्या सामन्यात भारताला १० विकेट्सने पराभूत केले. तर दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंडला पाच आणि आता अफगाणिस्तानला पाच विकेट्सने पराभूत केले आहे. पाकिस्तानने केलेल्या प्रदर्शनामुळे त्यांच्ये उपांत्य सामन्यातील स्थान जवळपास पक्के मानले जात आहे. पाकिस्तानला त्याचा पुढचा सामना २ नोव्हेंबरला नामिबियाविरुद्ध खेळायचा आहे. त्यानंतर सुपर १२ मधील त्याचा शेवटच्या सामन्यात ७ नोव्हेंबरला पाकिस्तानमोर स्कॉटलंडचे आव्हान असणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
क्या बात है! पाकिस्तानी फलंदाजाने करून दिली १५ वर्षे जुन्या एमएस धोनीची आठवण; कसं ते घ्या जाणून
न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यापूर्वी भारतीय खेळाडूंनी घेतला बीचवर वॉलीबॉल खेळण्याचा आनंद, पाहा व्हिडिओ
न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज म्हणतोय, ‘भारताच्या वरच्या फळीला उध्वस्त करण्याचा प्रयत्न करेल’






