टी-२० विश्वचषकातील २३ वा सामना वेस्ट इंडीज आणि बांगलादेश या दोन संघात पार पडला. हा सामना शारजाह क्रिकेट स्टेडियमवर खेळला गेला. सामन्यात शेवटच्या चेंडूपर्यंत रोमांचक लढत पाहायला मिळाली आणि शेवटच्या चेंडूवर वेस्ट इंडीजने तीन धावांनी विजय मिळवला. वेस्ट इंडीजने सामन्यात विजय मिळवला असला तरी, त्यांचा सलामीवीर फलंदाज ख्रिस गेलने पुन्हा एकदा निराश केले. गेलने या सामन्यात अवघ्या चार धावा केल्या आणि तो बाद झाला. गेल टी-२० विश्वचषकाच्या सुरुवातीपासून खराब फॉर्ममध्ये दिसला आहे. या सामन्यात गेल ज्याप्रकारे क्लीन बोल्ड झाला, त्याचा व्हिडिओ आयसीसीने त्यांच्या अधिकृत इस्टाग्राम खात्यावरून शेअर केला आहे.
सामन्याच्या सुरुवातीला बांगलादेशने नाणेफेक जिंकली आणि वेस्ट इंडीजला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. वेस्ट इंडीज संघाच्या डावात गेल सलामीसाठी मैदानात उतरला, पण काही खास कमाल करू शकला नाही. त्याने केवळ चार धावा केल्या आणि डावाच्या पाचव्या षटकात बांगलादेशच्या मेहदी हसनच्या गोलंदाजीवर क्लीन बोल्ड झाला.
गेल या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर मोठा शॉट खेळण्याच्या प्रयत्नात होता, पण चेंडू थेट स्टंपमध्ये गेला. गेलने १० चेंडूंचा सामना केला आणि संघाची धावसंख्या १८ असताना त्याने स्वत:ची विकेट गमावली.
https://www.instagram.com/reel/CVm_CsAFDzW
गेलने यापूर्वी विश्वचषकातील इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात १३ धावा केल्या होत्या. तसेच दक्षिण अफ्रिकाविरुद्धच्या सामन्यात त्याने फक्त १२ धावा केल्या होत्या. या दोन्ही सामन्यात वेस्ट इंडिजला पराभवाचा सामना करावा लागला होता.
दरम्यान, बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात वेस्ट इंडीजने प्रथम फलंदाजी केली आणि मर्यादित २० षटकांमध्ये सात विकेट्स मगावून १४२ धावा केल्या. यामध्ये निकोलस पुरनच्या ४० आणि रोस्टन चेसच्या ३९ धावांचा समावेश होता. प्रत्युत्तरात बांगलादेशने चांगलेच आव्हान दिले. बांगलादेशने सामन्याच्या शेवटच्या चेंडूपर्यंत संघर्ष केला, पण शेवटी त्यांना पराभव पत्करावा लागला. बांगलादेशने २० षटकांमध्ये पाच विकेट्सच्या नुकसानासह १३९ धावा केल्या. यामध्ये लिटन दासने सर्वाधिक ४४ धावा केल्या.
निकोलस पुरनला त्याच्या महत्वाच्या योगदानासाठी सामनावीर निवडले गेले.
महत्त्वाच्या बातम्या –
आजपर्यंतचे सर्व सात टी२० विश्वचषक खेळणारे ६ खेळाडू, भारताच्या रोहित शर्माचाही आहे समावेश
तेलही गेलं अन् तूपही गेलं! परेराकडून वॉर्नरला मिळालं ‘असं’ जीवदान की, सलामीवीरानं ठोकलं अर्धशतक
इट का जवाब पत्थर से! षटकार मारल्यानंतर पुढच्याच चेंडूवर स्टार्कने परेराला केलं ‘क्लीन बोल्ड’