वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा दिग्गज अष्टपैलू खेळाडू ड्वेन ब्रावोने शनिवारी (६ नोव्हेंबर) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. निवृत्तीनंतर ब्रावोने काही महत्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत. ब्रावोच्या मते नवीन पिढीने क्रिकेटमध्ये येण्यासाठी ही योग्य वेळ आहे. शनिवारी टी-२० विश्वचषकात त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्याचा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने वेस्ट इंडीजला ८ विकेट्सने पराभुत केले. ब्रावोला त्याच्या निवृत्तीनंतर गार्ड ऑफ ऑनरने सन्मानित केले गेले.
सामना संपल्यानंतर ब्रावो म्हणाला की, “माझे लक्ष्य काही वर्षांपूर्वीच निवृत्ती घेणे होते. मात्र, प्रेसिडेंस पदामध्ये झालेले परिवर्तन आणि लीडरशिपमध्ये झालेल्या बदलासोबतच माझे मन देखील वळले आणि मी वेस्ट इंडीजसाठी अजूनही खूप काही करू इच्छित होतो, कारण मी शारीरिक रुपाने अजून चांगल्या स्थितीत होतो आणि क्रिकेटचा आनंद घेत होतो. मी पोलार्डसोबत एक संक्षिप्त चर्चा केले आणि त्याला विचारले की, मी माघारी येऊन खेळाच्या सर्वात लहान प्रकारात खेळू इच्छितो, जी माझी विशेषता आहे. त्याने मला खेळण्याची पुन्हा संधी दिली आणि मी त्यासाठी खूप आभारी आहे.”
तो पुढे म्हणाला, “ही माझ्यासाठी खेळापासून लांब जाण्यासाठी योग्य वेळ आहे. पुढची पिढी आणि युवा खेळाडूंना संधी मिळाली पाहिजे, ज्यांच्यासोबत माझी खूप चांगली मैत्री आहे. आशा आहे की, त्यांची कारकीर्द देखील १२ ते १८ वर्षांची असावी.”
दरम्यान, वेस्ट इंडीज संघाचे टी२० विश्वचषकातील प्रदर्शन खूपच खराब राहीले आहे. त्यांनी सुपर १२ फेरीमध्ये केवळ एक सामना जिंकला आहे. इतर सर्व सामन्यांमध्ये वेस्ट इंडीजने पराभव पत्करवा लागला. वेस्ट इंडीज संघाला त्यांच्या शेवटच्या सामन्यातही ऑस्ट्रेलियाकडून ८ विकेट्सने पराभव मिळाला आहे. त्यांचा अष्टपैलू ड्वेन ब्रावोने १८ वर्षांच्या क्रिकेट कारकिर्दीनंतर निवृत्ती घेतली. ब्रावो यापूढे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दिसणार नाही. निवृत्तीनंतर त्याला गार्ड ऑफ ऑनरने सन्मानित केले गेले.






