आयसीसी टी२० विश्वचषक २०२१ मध्ये शनिवार रोजी (३० ऑक्टोबर) इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया संघ आमने सामने येणार आहेत. उभय संघांमध्ये यंदाच्या विश्वचषकातील २६ वा सामना रंगणार असून दुबईच्या दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर हे संघ भिडणार आहेत. दोन्ही संघांचा हा टी२० विश्वचषक २०२१ मधील तिसरा सामना असून आतापर्यंतच्या दोन्हीही सामन्यात हे संघ अजेय राहिले आहेत. त्यामुळे हा सामना जिंकणाऱ्या संघासाठी उपांत्य फेरीचे दार उघडेल.
अशात हे दोन्हीही संघ हा सामना जिंकण्यासाठी आपले सर्वोत्कृष्ट पणाला लावून खेळताना दिसतील. तत्पूर्वी पाहूया या संघांची आमने सामने कामगिरी कशी राहिली आहे?
टी२० क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड संघ २० वेळा आमने सामने आले आहेत. यातील अर्धे अर्थातच १० सामने ऑस्ट्रेलियाने जिंकले आहेत. तर इंग्लंडला ८ सामन्यांमध्ये विजय मिळवण्यात यश आले आहे. यातील एक सामना अनिर्णीत राहिला आहे. तसेच दोन्ही संघांमधील मागील ५ टी२० सामन्यांबाबत बोलायचे झाल्यास, इंग्लंडचे पारडे निसटते जड आहे. यामध्ये इंग्लंडने ३ तर ऑस्ट्रेलियाने २ सामने जिंकले आहेत.
तसेच टी२० विश्वचषकामध्ये हे दोन्ही संघ २ वेळा एकमेकांशी भिडले आहेत. यातील एक सामना ऑस्ट्रेलिया तर एक सामना इंग्लंड संघाने जिंकला आहे.
सामन्याविषयी अधिक माहिती-
सामना- इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया, सामना २६, सुपर १२ गट १
स्थळ- दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई
तारिख आणि वेळ- ३० ऑक्टोबर, दुपारी ७.३० वाजता, नाणेफेक ७०० वाजता
लाईव्ह स्ट्रिमिंग- स्टार स्पोर्ट्स नेटवर्क, डिज्नी+ हॉटस्टार
इंग्लंडची संभाव्य प्लेइंग इलेव्हन-
जेसन रॉय, जोस बटलर (यष्टीरक्षक), डेविड मलान, जॉनी बेअरस्टो, इयॉन मॉर्गन (कर्णधार), लियाम लिव्हिंगस्टोन, मोईन अली, ख्रिस वोक्स, ख्रिस जॉर्डन, आदिल रशीद, टायमल मिल्स
ऑस्ट्रेलियाची संभाव्य प्लेइंग इलेव्हन-
डेविड वॉर्नर, ऍरॉन फिंच (कर्णधार), मिचेल मार्श, स्टिव्ह स्मिथ, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉयनिस, मॅथ्यू वेड (यष्टीरक्षक), पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क, ऍडम झम्पा, जोश हेझलवूड
महत्त्वाच्या बातम्या-
टी२० क्रिकेट असो वा विश्वचषक, दक्षिण आफ्रिकाच पडलीय श्रीलंकेवर भारी; यंदा पलटणार का बाजी?
पाकिस्तानच्या विजयाच्या हॅट्रिकने बदललं गुणतालिकेचं समीकरण, ‘हा’ संघ सेमीफायनलच्या शर्यतीतून बाहेर