---Advertisement---

पत्रकारानं केली हिंदीत उत्तर देण्याची विनंती, ईश सोढी म्हणे, ‘आईने पाहिलं तर…’

On: सोमवार, नोव्हेंबर 1, 2021 8:39 PM
---Advertisement---

भारत आणि न्यूझीलंडमध्ये रविवारी (३१ ऑक्टोबर) आमना-सामना झाला. या सामन्यात न्यूझीलंडने भारताचा दारुण पराभव केला. न्यूझीलंडने सामन्यात आठ विकेट्सने विजय मिळवला आणि विश्वचषकाच्या उपांत्य सामन्याच्या शर्यतीत स्वत:चे स्थान भक्कम केले. भारतीय संघ या पराभवानंतर जवळपास स्पर्धेतून बाहेर पडला आहे. या सामन्यात न्यूझीलंडच्या ईश सोढीने उत्कृष्ट प्रदर्शन करत चार षटकांमध्ये १७ धावा दिल्या आणि दोन विकेट्स घेतल्या. या सामन्यानंतर एका प्रत्रकाराने त्याला हिंदीत बोलण्याचा आग्रह केला, पण सोढीने यावर सर्वांना चकित करणारे उत्तर दिले आहे.

ईस सोढीला त्याच्या उत्कृष्ट प्रदर्शनासाठी सामन्यानंतर सामनावीर निवडले गेले. ईस सोढीचे कुटुंब मूळचे भारतीय आहे. याच पार्श्वभूमीवर सामन्यानंतर एका पत्रकाराने त्याला प्रश्न विचारला आणि त्याचे उत्तर हिंदीमध्ये देण्याचा आग्रह केला. पत्रकाराने त्याला विचारले होते की, एका क्रिकेटपटूला आधी आणि नंतर गोलंदाजी करताना कोणत्या एडजस्टमेंटला लक्षात ठेवावे लागते ? यानंतर पत्रकाराने सोढीला हिंदीमध्ये उत्तर देण्याची विनंती केली.

पत्रकाराने हिंदीत बोलण्याची केलेली विनंती ऐकून सोढीने एक मजेशीर उत्तर दिले आहे.  तो इंग्रजीत म्हणाला की, “हे पाहा सर, येथे माझ्या हिंदीची परीक्षा होत आहे. जर माझ्या आईने हे पाहिले आणि मी हिंदी बोलताना काही गडबडलो तर, मला ओरडा खावा लागू शकतो. तर यामुळे मी यावेळी इंग्रजीमध्ये उत्तर देतो, पण आशा आहे की, मी माझ्या हिंदीमध्ये सुधारणा करू शकेल.”

न्यूझीलंड संघाने या सामन्यापूर्वी दुबईमध्ये खेळल्या गेलेल्या इतर सामन्यांचा अभ्यास केला आणि त्याठिकाणच्या परिस्थितीला समजून घेण्याचा प्रयत्न केला, असेही सोढीने स्पष्ट केले. तो म्हणाला की, “आम्ही दुबईच्या स्टेडियममध्ये खेळल्या गेलेल्या काही सामन्यांचे निरिक्षण केले होते आणि येथील परिस्थितीलाही समजून घेण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतरच आम्ही येथे खेळण्यासाठी आलो आहोत.”

महत्त्वाच्या बातम्या – 

“विराट मानसिकदृष्ट्या कमकुवत”; भारतीय दिग्गजाची जहरी शब्दांत टीका

“केवळ विराट नाही, तर संपूर्ण संघ आणि सर्व प्रशिक्षकही अपयशी ठरलेत”

न्यूझीलंडविरुद्ध भारताने केल्या ‘या’ पाच चुका, ज्यामुळे संघाला करावा लागला पराभवाचा सामना

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---