आयसीसी टी२० विश्वचषकाच्या २१ व्या सामन्यात नामिबिया आणि स्कॉटलंड हे दोन संघ आमने-सामने होते. हा सामना अबुधाबीच्या शेख झायेद स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात नामिबियाने स्कॉटलंडवर चार विकेट्स राखून विजय मिळवला.
सामन्यात नामिबियाने नाणेफेक जिंकली आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. या सामन्यात नामिबियाच्या गोलंदाजांनी जबरदस्त गोलंदाजीचे प्रदर्शन केले आणि स्कॉटलंडला मोठी धावसंख्या करण्यापासून रोखले. परिणामी स्कॉटलंडला पराभवाचा सामना करावा लागला.
नामिबियाने या सामन्यात उत्कृष्ट गोलंदाजीचे प्रदर्शन केले. त्यांच्या रुबेन ट्रम्पलमनने सामन्याच्या पहिल्याच षटकात स्कॉटलंडचे तीन महत्वाचे विकेट्स घेतले. रुबेनने पहिल्या षटकात घेतलेल्या तीन विकेट्समुळे नामिबियाने पहिल्यापासूनच सामन्यात वर्चस्व निर्माण केले होते. तसेच रुबेन त्याच्या प्रदर्शनाच्या जोरावर टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये डावाच्या पहिल्या षटकात तीन विकेट्स घेणारा पहिलाच खेळाडू ठरला. त्याला त्याच्या उत्कृष्ट प्रदर्शनासाठी सामनावीर पुरस्कारही देण्यात आला.
दरम्यन, सामन्यात स्कॉटलंडने प्रथम फलंदाजी केली आणि संघ मर्यादित २० षटकांमध्ये ८ विकेट्सच्या नुकसानावर अवघ्या १०९ धावा करू शकला. स्कॉटलंडसाठी मायकल लियास्कने चार चौकार आणि दोन षटकारांच्या जोरावर २७ चेंडूत सर्वाधिक ४४ धावा केल्या. तसेच क्रिस ग्रेविसनेही दौन चौकारांच्या मदतीने ३२ चेंडूत २५ धावांचे योगदान दिले. नामिबियाकडून रुबेनव्यतिरिक्त जान फ्रायलिंकनेही दोन विकेट्स घेतल्याने. त्याने त्याच्या चार षटकांच्या कोट्यात अवघ्या १० देत ही कामगिरी केली आहे.
स्कॉटलंडने दिलेले लक्ष्य सोपे असले तरी, सामना शेवटच्या षटकापर्यंत खेळला गेला आणि नामिबियाने १९.१ षटकांत जिंकला. स्कॉटलंडने दिलेल्या ११० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना नामिबियाला शेवटच्या षटकापर्यंत खेळावे लागेल. नामिबियाच्या जेजे स्मिथने दोन चौकार आण दोन षटकारांच्या मदतीने २३ चेंडूत सर्वाधिक ३२ धावांची नाबाद खेळी केली. याव्यतिरिक्त सलामीवीर क्रेग विलियम्सने २९ चेंडूत २३ धावांचे योगदान दिले. त्याने केलेल्या या खेळीमध्ये एक षटकाराचाही समावेश होता.
स्कॉटलंडकडून मायकेल लियास्कने सर्वाधिक २ विकेट्स घेतल्या.
महत्त्वाच्या बातम्या –
“द्रविडने प्रशिक्षकपदासाठी अर्ज केल्यानंतर दुसऱ्या कोणी अर्ज करण्याची गरज नाही”
फिरकीची जादू! टी२० विश्वचषकात एका सामन्यात ५ विकेट्स घेणारे तीन फिरकीपटू
केवळ रोहितच नाही, तर ‘हे’ दोन भारतीय देखील टी२० विश्वचषकात पाकिस्तानविरुद्ध झालेत शुन्यावर बाद