टी२० विश्वचषकात रविवारी (३१ ऑक्टोबर) भारत आणि न्यूझीलंड या दोन बलाढ्य संघांमधील सामना चाहत्यांना पाहायला मिळणार आहे. हा सामना दोन्ही संघासांठी अत्यंत महत्वाचा आहे. भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांना टी२० विश्वचषकातील त्यांच्या पहिल्या सामन्यात पाकिस्तानकडून पराभव मिळाला आहे. तर, दुसरीकडे पाकिस्तानने विश्वचषकातील त्याचे सलग तीन सामने जिंकले आहेत. अशात भारतीय संघाला उपांत्य सामन्यापर्यंत पोहोचण्याची आशा कायम ठेवायची असेल, तर न्यूझीलंडविरुद्धचा सामना जिंकणे खूप गरजेचे झाले आहे. अशातच न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज ऍडम मिल्ने देखील मात्र या सामन्यासाठी खूप उत्सुक दिसत आहे.
मिल्नेला टी-२० विश्वचषकासाठी आधी संधी दिले गेली नव्हती, पण लॉकी फर्ग्यूसनला दुखापत झाल्यामुळे त्याला न्यूझीलंडच्या संघात सामील केले गेले. त्याने यावर्षी द हंड्रेडमध्ये खेळताना चांगले प्रदर्शन केले आहे. याव्यतिरिक्त आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स संघाने त्याला दिलेल्या संधीचाही त्याने योग्य उपयोग करून घेतला आहे. आता भारताविरुद्धच्या सामन्यात खेळण्यासाठी तो अजून वाट पाहू शकत नसल्याचे मिल्नेने म्हटले आहे. तसेच तो त्याच्या सर्वात चांगल्या फॉर्ममध्ये असल्याचेही त्याने स्पष्ट केले आहे.
भारत आणि न्यूझीलंडच्या सामन्यापूर्वी मिल्ने म्हणाला की, मला निश्चित वाटते की, हा माझा सर्वत चांगला काळ राहिला आहे. मी विश्वचषक सामन्यात माझ्या चेंडूने बदल आणण्यासाठी उत्साहित आहे आणि प्रत्यक्षात हे सिद्ध करू इच्छित आहे. क्रिकेटचा हा काळ माझ्यासाठी प्रभावशाली राहिला आहे. तो पुढे म्हणाला की, तो वेगवान गोलंदाजी करून पाकिस्तानच्या शाहीन शाह अफ्रिदीप्रमाणे भारताच्या वरच्या फळीला हैराण करण्याची आशा करत आहे. तो भारताच्या वरच्या फळीली उध्वस्त करू इच्छितो.
दरम्यान, डाव्या हाताने गोलंदाजी करणाऱ्या ऍडम मिल्नेला अनेकदा १५० किमीच्या वेगाने गोलंदाजी करताना पाहिले गेले आहे. न्यूझीलंड आणि पाकिस्तान यांच्या झालल्या सामन्यात त्याला सामील होता आले नाही. आयसीसीच्या टेक्निकल कमेटीने त्याला पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात खेळण्यासाठी परवानगी दिली नव्हती. मिल्ने यापूर्वी ऑस्ट्रेलियाच्या बिग बॅश लीग, द हंड्रेड लीग आणि आयपीएलमध्ये खेळला आहे. त्याने या तिनही लीगमध्ये उत्कृष्ट प्रदर्शन केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
श्रेयस अय्यर सोडणार दिल्ली कॅपिटल्सची साथ? ही गोष्ट ठरू शकते कारणीभूत
न्यूझीलंडविरुद्ध होणार भारताची आभासी ‘क्वार्टर-फायनल’! असे असेल उपांत्य फेरीचे समीकरण