आंतरराष्ट्रीय क्रिकेट काउंसिलच्या (आयसीसी) टी२० विश्वचषक २०२१ ची रविवारपासून (१७ ऑक्टोबर) सुरुवात होते आहे. संयुक्त अरब अमिराती आणि ओमान येथे हे सामने खेळवले जाणार आहेत. २४ ऑक्टोबरपासून भारतीय संघ त्यांच्या टी२० विश्वचषक मोहिमेचा शुभारंभ करेल. त्यांची पहिलीच लढत पारंपारिक प्रतिद्वंद्वी पाकिस्तानविरुद्ध रंगणार आहे. या लढतीपूर्वी भारतीय संघाने त्यांची जर्सी लॉन्च केली आहे. आता भारताबरोबरच पाकिस्ताननेही त्यांची नवी जर्सी चाहत्यांच्या भेटीला आणली आहे.
महत्त्वाचे म्हणजे, पाकिस्तान संघाने लॉन्च केलेल्या जर्सीवर यंदाचा टी२० विश्वचषक आयोजक भारतीय संघाचे नाव लिहिलेले आहे.
यापूर्वी पाकिस्तान टी२० संघाचा कर्णधार बाबर आझम याचा टी२० विश्वचषकाची जर्सी घातलेला एक फोटो व्हायरल झाला होता. या फोटोमध्ये त्याच्या जर्सीवर भारतीय संघाचे नाव लिहिलेले नव्हते. याच कारणास्तव भारतीय चाहत्यांनी त्याच्यासहित पाकिस्तान क्रिकेट संघावर निशाणा साधला होता. परंतु आता पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने अधिकृतपणे जाहीर केलेल्या जर्सीवर भारताचे नाव लिहिलेले असल्याने या चर्चांवर पूर्णविराम लागला आहे.
Team Pakistan 🇵🇰 is up for the fight!
Get behind @babarazam258 and the boys to show your support for Pakistan at the @T20WorldCup.
Get your official shirt now!
Order now at https://t.co/A91XbZsSbJ#WearYourPassion x #WhyNotMeriJaan pic.twitter.com/KAGlD11RzQ— Pakistan Cricket (@TheRealPCB) October 15, 2021
जर्सीवर भारताचे नाव लिहिण्यामागचे कारण
आयसीसीच्या नियमांनुसार, विश्वचषक आयोजित करणाऱ्या देशाचे नाव प्रत्येक संघाच्या जर्सीवर असायला पाहिजे. यावर्षीचा टी२० विश्वचषक भलेही युएई आणि ओमानमध्ये खेळला जाणार आहे. परंतु त्याचे यजमानपद मात्र भारतीय संघाकडेच आहे. कोरोना महामारीमुळे भारतात होणारी ही स्पर्धा युएई आणि ओमानमध्ये हलवण्यात आली आहे. याच कारणामुळे टी२० विश्वचषकात सहभागी सर्व संघांच्या जर्सीवर स्पर्धेच्या नावासहित भारतीय संघाचेही नाव लिहिले गेलेले आहे.
भारतीय संघ खेळणार सराव सामने
२४ ऑक्टोबरपासून टी२० विश्वचषक स्पर्धेची सुरुवात करण्यापूर्वी भारतीय संघ २ सराव सामनेही खेळणार आहे. १८ ऑक्टोबर रोजी इंग्लंडविरुद्ध त्यांचा पहिला सराव सामना होईल. त्यानंतर २० ऑक्टोबर रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध ते दुसरा सराव सामना खेळतील. हे दोन्ही सराव सामने दुबई येथे होणार आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
पाकिस्तानविरुद्धच्या लढतीपूर्वी भारत ‘या’ दोन बलाढ्य संघांशी करणार दोन हात, पाहा संपूर्ण वेळापत्रक
“मी तितका भाग्यशाली नाही की, मी धोनी असलेला ड्रेसिंग रूमचा भाग होईल”, गावसकरांनी गायले गुणगान