रविवारी (३१ ऑक्टोबर) भारताला टी२० विश्वचषकातील सलग दुसरा पराभव मिळाला. या सामन्यात भारतीय संघासमोर न्यूझीलंडचे आव्हान होते. न्यूझीलंडने भारतीय संघावर आठ विकेट्स राखून विजय मिळवला. या सामन्यासाठी भारतीय संघात काही खास बदल करण्यात आले होते. श्रीलंका संघाचा माजी कर्णधार महेला जयवर्धनेने भारतीय संघात या सामन्यासाठी केलेला एक बदल चुकीचा ठरल्याचे सांगितले आहे.
जयवर्धनेच्या मते रोहित शर्माने या सामन्यात डावाची सुरुवात करायला पाहिज होती, जी तो नेहमी करतो. न्यूझीलंडविरुद्ध सामन्यात भारताचा नियमित सलामीवीर रोहित शर्मा तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी आला. रोहितच्या जागी ईशान किशनने केएल राहुलसह डावाची सुरुवात केली. जयवर्धनेच्या मते संघाने घेतलेला हा निर्णय चुकीचा होता.
जयवर्धने इएसपीएन क्रिकइंफोसोबत बोलत होता. यावेळी तो म्हणाला की, “तुम्ही लवचिक (फलंदाजी स्थानाबद्दल) असू शकता, पण तुमच्या पहिल्या तीन फलंदाजांसोबत नाही. जर तुम्ही जास्तीत जास्त संघ पाहिले तर तुम्हाला पहिल्या तीन फलंदाजांमध्ये जास्त बदल पाहायला मिळणार नाहीत. हे तिनही फलंदाज तुमच्या डावाची दिशा निर्धारित करत असतात.”
“तो (रोहित) टी-२० क्रिकेटमध्ये डावाची सुरुवात करतो आणि विराट कोहली एकतर सलामीवीराच्या रूपात खेळतो किंवा तिसऱ्या क्रमांकावर येतो. मला वाटते की, केएल राहुलला चौथ्या क्रमांकावर पाठवले जाऊ शकले असते, कारण तो लवकर कोणतीही फलंदाजीची पोजिशन घेतो. मला असे वाटते की, एवढ्या सगळ्या बदलांच्या जागी भारतीय संघ हे करू शकत होता की, एक खेळाडू बाहेर आणि त्याच्या जागी दुसरा खेळाडू संघात. तुम्ही तीन फलंदाजांची फलंदाजी क्रमवारी बदलण्याच्या जागी, फक्त एका फलंदाजाचे स्थान बदलू शकत होता,” असेही जयवर्धनेने यावेळी सुचवले.
दरम्यान, भारत आणि न्यूझीलंड यांच्यात खेळला गेलेला सामना दोन्ही संघांसाठी अत्यांत महत्वाचा होता. पण भारतीय संघाला या सामनयात पराभव पत्करावा लागला. याआधी भारताला विश्वचषकातील पहिला सामन्यात पाकिस्ताविरुद्ध पराभव मिळाला होता. विश्वचषकात सलग दोन पराभव मिळाल्यानंतर भारत आता स्पर्धेच्या उपांत्या सामन्याच्या शर्यतीतून जवळपास बाहेर पडला आहे. तर दुसरीकडे न्यूझीलंडकडे उपांत्य सामन्यात स्थान मिळवण्यासाठी संधी आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
“जसा भारतासाठी एमएस धोनी, तसाच इंग्लंडसाठी ओएन मॉर्गन”, भारतीय क्रिकेटरकडून कौतुक
न्यूझीलंडविरुद्ध उतरणार भारताची ‘यंग ब्रिगेड’; ऋतुराजसह हे खेळाडू असणार संघाचा भाग
संपूर्ण वर्षात बाबर-रिझवानचा धूमाकूळ; शतकी भागीदारीसह बनविला विश्वविक्रम