---Advertisement---

‘…आणि लोकांना रोहित कर्णधार म्हणून हवा आहे’, न्यूझीलंडविरुद्धच्या पराभवानंतर ‘हिटमॅन’ जोरदार ट्रोल

On: सोमवार, नोव्हेंबर 1, 2021 9:45 PM
---Advertisement---

भारत आणि न्यूझीलंडमध्ये टी२० विश्वचषकाचा २८ वा सामना खेळला गेला. या सामन्यात न्यूझीलंडने भारताचा दारुण पराभव केला. न्यूझीलंडने हा सामना आठ विकेट्स राखून जिंकला. भारताने या सामन्यात नाणेफेक गमावली आणि संघाला प्रथम फलंदाजी करावी लागली. डावाची सुरुवात सलामीवीर चांगली करू शकले नाही आणि त्यानंतर भारतीय संघाला गळती लागली. परिणामी संघाला मोठी धावसंख्या करता आली नाही. रोहित शर्माने या सामन्यात केलेल्या खराब प्रदर्शनानंतर नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर त्याचा चांगलेच ट्रोल केले आहे.

या सामन्यात रोहित तिसऱ्या क्रमांकावर खेळला आणि त्याच्या जागी ईशान किशनने डावाची सुरुवात केली. रोहित याआधीच्या पाकिस्तानविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात त्याचे खातेही खोलू शकला नव्हता. न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात तो खेळपट्टीवर आला, तेव्हा चांगल्या लयीत दिसत होता, पण एक चुकीचा शॉट खेळल्यामुळे तो बाद झाला. त्याने १४ चेंडूत १४ धावा केल्या. रोहित न्यूझीलंडचा फिरकी गोलंदाज ईश सोढीच्या चेंडूवर षटकार मारण्याच्या नादात बाद झाला.

रोहित ईश सोढीच्या चेंडूवर लॉंन ऑनवरून षटकार मारण्याच्या प्रयत्नात होता, पण चेंडू मार्टिन गप्टिलच्या हातात गेला आणि तो झेलबाद झाला. रोहितने महत्वाच्या वेळी विकेट गमावल्यानंतर भारतीय संघ अडचणीत आला होता. त्यानंतर नेटकऱ्यांनी त्याला चांगलेच ट्रोल केले आहे. काहींनी त्याने मारलेल्या चुकीच्या शॉटवर निशाणा साधला, तर काहींनी थेट त्याला संघातून बाहेर करण्याची मागणी केली आहे. नेटकरी वेगवेगळ्या पद्धतीने ट्वीटरवर व्यक्त होत आहेत.

एका युजरने लिहिले आहे की ‘सॉरी पण रोहित शर्माचा खेळ संपला आहे. त्याला आता काढून टाकण्याची वेळ आली आहे, जसे धोनीने विरेंद्र सेहवागला काढले होते.’ दुसऱ्या युजरने लिहिले की ‘…आणि लोकांना रोहित कर्णधार म्हणून हवा आहे.’

https://twitter.com/abhicinque/status/1454820887148969993

https://twitter.com/pratapmh2303/status/1454820994321829894

https://twitter.com/imVKorat/status/1454820990941204487

https://twitter.com/smitapandhawale/status/1454820913061326858

https://twitter.com/RMohsin17/status/1454820903632572428

https://twitter.com/pawan29082011/status/1454820898704216072

https://twitter.com/iamSiddhesh56/status/1454830677791150088

https://twitter.com/Sayda_2203/status/1454830640919195649

दरम्यान, सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकली आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताच्या डावाची सुरुवात करण्यासाठी आलेला ईशान किशन अपेक्षित कामगिरी करू शकला नाही आणि चार धावा करून तंबूत परतला. त्यानंतर केएल राहुलही स्वस्तात बाद झाला. भारतीय संघासाठी रवींद्र जडेजाने १९ चेंडूत सर्वाधिक २६ धावांची नाबाद खेळी केली. न्यूझीलंडच्या ईश सोढीने चार षटकांमध्ये १७ धावा दिल्या आणि दोन विकेट्स घेतल्या. त्याने केलेली ही कामगिरी न्यूझीलंडच्या विजयामध्ये महत्वाची ठरली.

महत्त्वाच्या बातम्या – 

लज्जास्पद! विराट-अनुष्काच्या १० महिन्यांच्या मुलीला आल्या हीन दर्जाच्या धमक्या

पत्रकारानं केली हिंदीत उत्तर देण्याची विनंती, ईश सोढी म्हणे, ‘आईने पाहिलं तर…’

“विराट मानसिकदृष्ट्या कमकुवत”; भारतीय दिग्गजाची जहरी शब्दांत टीका

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---