भारतीय संघ टी-२० विश्वचषकातील त्याच्या दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंड संघासोबत रविवारी (३१ ऑक्टोबर) भिडणार आहे. हा सामना दोन्ही संघांसाठी अत्यंत महत्वाचा असणार आहे. पाकिस्तानने त्याचे पहिले तिन्ही सामने जिंकल्यामुळे या दोन संघांना उपांत्य फेरीपर्यंत पोहोचण्याचा मार्ग सोपा करण्यासाठी हा सामना जिंकणे गरजेचे असणार आहे. असे असले तरी, भारतीय संघ मात्र यूएईमध्ये समुद्रकिनारी मजा घेत असल्याचे दिसत आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यापूर्वी बीसीसीआयने संघ वॉलीबॉल खेळतानाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे.
या व्हिडिओ भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि सध्याचा मेंटॉर महेंद्रसिंग धोनीही खेळाडूंसोबत वॉलीबॉलचा आनंद घेताना दिसत आहे. बीसीसीआयने त्यांच्या अधिकृत ट्वीटर खात्यावरून भारतीय खेळाडूंचा हा खास व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओ १ मिनिट आणि ५६ सेकंदाचा आहे.
व्हिडिओत पाहिले जाऊ शकते की, महेंद्रसिंग धोनी, सलामीवीर फलंदाज रोहित शर्मा, अष्ठपैलू हार्दिक पांड्या, यष्टीरक्षक केएल राहुल, कर्णधरा विराट कोहली, श्रेयस अय्यर, वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार यांच्यासह भारतीय संघातील इतरही खेळाडू दिसत आहेत. सर्वजण बीचवर खेळाचा आनंद घेत आहेत.
A game of beach volleyball as #TeamIndia unwinds in their day off! 👍 👌#T20WorldCup pic.twitter.com/3JXOL17Rr3
— BCCI (@BCCI) October 29, 2021
पाकिस्तनविरुद्ध पराभवानंतर रविवारी भारतीय संघ न्यूझीलंडचा सामना करणार आहे. यापूर्वी बुधवारी संघाने सरावाला सुरुवात केली होती. बुधवारी भारतीय संघ सरावासाठी मैदानावर पोहोचल्यानंतर बीसीसीआयने सराव सत्रातील काही फोटो ट्वीटवर शेअर केले होते. सराव सत्रात भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याने खूप दिवसांनी गोलंदाजी केली आणि संघ व्यवस्थापनाची चिंता थोडी कमी केली.
तत्पूर्वी, भाराताला विश्वचषकातील पहिल्या सामन्यात पाकिस्तानकडून दारुण पाराभवाचा सामना करावा लागला होता. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आजमने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी केरण्याचा निर्णय घतला होता. पाकिस्तानने सामन्यात जबरदस्त गोलंदाजीचे प्रदर्शन केले होते. भारताचे सलामीवीर रोहित शर्मा आणि केएल राहुल स्वस्तात बाद झाले आणि नंतर कर्णधार विराट कोहलीने डाव सावरला.
विराटने केलेल्या ५७ धावांच्या खेळीच्या जोरावर संघाने पाकिस्तानला १५२ धावांचे लक्ष्य दिले होते. प्रत्युत्तरात पाकिस्तानने एकही विकेट न गमावता विजय मिळवला. कर्णधार बाबर आजम आणि मोहम्मद रिजवानने उत्कृष्ट फलंदाजीचे प्रदर्शन केले होते.
महत्त्वाच्या बातम्या –
न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज म्हणतोय, ‘भारताच्या वरच्या फळीला उध्वस्त करण्याचा प्रयत्न करेल’
श्रेयस अय्यर सोडणार दिल्ली कॅपिटल्सची साथ? ही गोष्ट ठरू शकते कारणीभूत
न्यूझीलंडविरुद्ध होणार भारताची आभासी ‘क्वार्टर-फायनल’! असे असेल उपांत्य फेरीचे समीकरण