आगामी टी२० विश्वचषकासाठी वेस्टइंडीज संघाची घोषणा करण्यात आली आहे. विश्वचषकासाठीच्या संघात अनुभवी क्रिस गेल आणि अष्टपैलू ड्वेन ब्रावोलाही क्रिकेट बोर्डाने १५ सदस्यीय संघात सामील केले गेले आहे. वेस्टइंडीज क्रिकेट बोर्डाने त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटद्वारे विश्वचषकासाठीच्या संघाची घोषणा केली आहे. संघाचे कर्णधारपद कीरोन पोलार्ड सांभाळणार आहे. विश्वचषक १७ ऑक्टोंबर ते १४ नोव्हेंबर या काळात यूएई आणि ओमानमध्ये आयोजित केला गेला आहे.
विश्वचषक जिंकण्यासाठीचा प्रमुख दावेदार मानला वेस्टइंडीज संघ अनुभवी खेळाडूंनी भरलेला आहे. संघात विस्फोटक सलामीवीर क्रिस गेलला सामील केले गेले आहे. तसेच २०१३ नंतर कोणत्याच आयसीसी क्रिकट स्पर्धा न खेळलेल्या कीरोन पोलार्डला संघाचा कर्णधार बनवण्यात आले आहे. त्याव्यतिरिक्त ड्वेन ब्रावो, लेंडल सिमंस यांनाही संघात स्थान दिले गेले आहे, जे यापूर्वीही टी२० विश्वचषक विजेत्या संघाचा भाग होते. तसेच तब्बल ६ वर्षांनंतर ३६ वर्षीय वेगवान गोलंदाज रवी रामपॉल यांचे संघात पुनरागमन झाले आहे.
हा आयसीसी टी२० विश्वचषक वेस्टइंडीज संघातील अनेक खेळाडूंसाठी शेवटचा विश्वचषक ठरू शकतो. अशात खेळाडूंचे प्रदर्शन पाहण्यासारखे असेल.
CWI announces squad for the ICC T20 World Cup 2021🏆 #MissionMaroon #T20WorldCup
World Cup Squad details⬇️https://t.co/qoNah4GTZS pic.twitter.com/IYGQNBobgi
— Windies Cricket (@windiescricket) September 9, 2021
विश्वचषकात वेस्टइंडीजच्या संघाला ग्रुप १ मध्ये सामील केले गेले आहे. या ग्रुपमध्ये ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, दक्षिण अफ्रिका आणि वेस्टइंडीज अशा बलाढ्य संघांचा समावेश आहे. त्याव्यतिरिक्त या ग्रुपमध्ये दोन क्वालिफायर संघाचाही समावेश आहे. वेस्टइंडीज विश्वचषकातील त्यांचा पहिला सामना २३ ऑक्टोंबरला इंग्लंडविरुद्ध खेळणार आहे. वेस्टइंडीज संघ मागील टी२० विश्वचषकाचा विजेता संघ आहे. त्यांनी २०१६ मध्ये विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात इंग्लंडविरुद्ध जिंकून त्यांचा आतापर्यंतच्या क्रिकेट इतिहासातील दुसरा टी २० विश्वचषक जिंकला.
टी२० विश्वचषकासाठी वेस्टइंडीजचा संघ
कीरोन पोलार्ड (कर्णधार) , निकोलस पूरन, फॅबियन एलन, ड्वेन ब्रावो, रोस्टन चेज, आंद्रे फ्लेचर, क्रिस गेल, शिमरोन हेटमायर, एविन लुईस, ओबेड मैककॉय, रवि रामपॉल, आंद्रे रसेल, लेंडल सिमंस, ओशेन थॉमस, हेडन वॉल्श
राखीव खेळाडू: डॅरेन ब्रावो, शेल्डन कॉटरेल, जेसन होल्डर, अकील होसेन
महत्त्वाच्या बातम्या-
टी२० विश्वचषकासाठी अफगाणिस्तानचा संघ जाहीर, मोहम्मद नबीकडे कर्णधारपद; पाहा संपूर्ण टीम
रोहिच-पुजाराच्या खेळण्यावर प्रश्नचिन्ह, ‘या’ विस्फोटक फलंदाजाला मिळू शकते कसोटी पदार्पणाची संधी