---Advertisement---

आपली टीम इंडियाची जर्सी ‘या’ खेळाडूंना देऊन अर्शदीप अन् चहल बनले हिरो, पाहा फोटो

Yuzvendra-Chahal-And-Arshdeep-Singh
---Advertisement---

भारतीय क्रिकेट संघाने टी20 विश्वचषक 2022मध्ये उत्तम कामगिरी केली आहे. भारतीय गोलंदाज आणि फलंदाज दोघेही या स्पर्धेत चमकले आहेत. त्यांच्या कामगिरीमुळे त्यांनी सर्वांची मने जिंकली आहे. अशात भारताच्या दोन गोलंदाजांनी नेदरलँड्स संघाच्या खेळाडूंना आपली जर्सी देऊन सर्वांचे लक्ष वेधले. चला तर पाहूया कोण आहेत ते दोन भारतीय खेळाडू ज्यांनी नेदरलँड्सच्या खेळाडूंना जर्सी दिली आहे.

नेदरलँड्सच्या खेळाडूंनी जर्सी देणारे भारतीय गोलंदाज इतर कुणी नसून अर्शदीप सिंग (Arshdeep Singh) आणि युझवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) हे आहेत. त्यांनी नेदरलँड्सच्या विक्रमजीत सिंग (Vikramjit Singh) आणि शारिज अहमद (Shariz Ahmed) यांना आपली भारतीय संघाची जर्सी भेट म्हणून दिली. नेदरलँड्सच्या या दोन्ही खेळाडूंनी त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर स्टोरी शेअर करत ही माहिती दिली.

Shariz-Ahmed-Story
Photo Courtesy: Instagram/shamofication
Shariz-Ahmed
Photo Courtesy: Instagram/shamofication

भारत आणि नेदरलँड्स संघात झालेल्या सामन्यानंतर या खेळाडूंनी एकमेकांसोबत वेळ घालवला. मात्र, या सामन्यात भारतीय संघाने सहजरीत्या हा सामना आपल्या नावावर केला. मात्र, दिग्गज खेळाडूंना भेटून नेदरलँड्सचे युवा खेळाडूही एकदम खुश झाले. विक्रमजीत सिंग याला भारतीय संघाविरुद्ध खेळण्याची संधी मिळाली होती. मात्र, तो फलंदाजीत कमाल दाखवण्यात अपयशी ठरला. भुवनेश्वर कुमार याने त्याला 1 धावेवर त्रिफळाचीत केले होते. याव्यतिरिक्त शारिज अहमद याला गोलंदाजीची संधी मिळाली. त्यात त्याने टाकलेल्या 1 षटकात 5 धावा दिल्या आणि फलंदाजी करताना नाबाद 16 धावांचे योगदान दिले होते.

Vikramjit-Singh
Photo Courtesy: Instagram/vikram

टी20 विश्वचषकात नेदरलँड्स संघाचे पहिल्या फेरीतील प्रदर्शन शानदार होते. नामीबिया आणि यूएई संघाला सलग सामन्यात पराभूत करत या संघाने सुपर 12च्या दुसऱ्या गटात स्थान मिळवले होते. यामध्ये त्यांची सुरुवात चांगली झाली नाही. मात्र, नुकतेच त्यांनी झिम्बाब्वे संघाविरुद्धचा सामना आपल्या नावावर केला. नेदरलँड्सने झिम्बाब्वेला 5 विकेट्सने पराभूत केले आणि सुपर 12 फेरीतील आपला पहिला सामना नावावर केला होता.

नेदरलँड्स संघाला बांगलादेश, भारत आणि पाकिस्तान संघांविरुद्ध पराभूत व्हावे लागले. नेदरलँड्सचा गटातील शेवटचा सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 6 नोव्हेंबर रोजी खेळला जाईल. या सामन्यात विजय मिळवून संघ स्पर्धेत आपली छाप सोडण्याचा प्रयत्न करेल.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
ऑस्ट्रेलियाला मिळवायचंय टी20 विश्वचषकाच्या सेमीफायनलचे तिकीट, ‘ही’ आहेत 3 समीकरणे
आरसीबीची दक्षिण आफ्रिकी तोफ भारतात दाखल! कारणही तितकंच खास

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---