---Advertisement---

पाकिस्तानविरुद्ध चहल की अश्विन?आयसीसीने जाहीर केली ‘हायव्होल्टेज’ सामन्यासाठी भारताची प्लेईंग इलेवन

On: रविवार, ऑक्टोबर 16, 2022 10:24 AM
R Ashwin and Yuzvendra Chahal
---Advertisement---

पुरूष टी20 विश्वचषकाचा (T20 World Cup) आरंभ आजपासून म्हणजेच रविवार (16 ऑक्टोबर) झाला आहे. या स्पर्धेत एकूण 16 संघानी सहभाग घेतला आहे. यासाठी आयसीसीने सर्व संघाच्या पहिल्या सामन्यासाठी अंतिम अकरा खेळाडूंची नावे जाहीर केली आहे. यामध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान या सामन्याचाही समावेश आहे. भारताच्या प्लेईंग इलेवनमध्ये आयसीसीने स्टार गोलंदाज मोहम्मद शमी याच्याबरोबर आर अश्विन आणि रिषभ पंत यांना वगळले आहे.

आर अश्विन याला आयसीसीने पाकिस्तान विरुद्ध अंतिम अकरामध्ये स्थान न दिल्याने युझवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) आणि अक्षर पटेल या दोन स्पिनर्सला संघात घेतले आहे. भारत 23 ऑक्टोबरला मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर पाकिस्तानशी भिडणार आहे.

आयसीसीने पाकिस्तानविरुद्ध निवडलेल्या भारताच्या अंतिम अकरामध्ये रोहित शर्मा आणि केएल राहुल यांना सलामीवीर म्हणून घेतले आहे, तर विराट कोहली (Virat Kohli) तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करणार. चौथ्या क्रमांकावर सूर्यकुमार यादव आहे. त्याच्यानंतर हार्दिक पंड्या आणि दिनेश कार्तिक यांना जागा दिली आहे. भारताचा हा फलंदाजी क्रम जवळपास निश्चित आहे, मात्र प्रश्न गोलंदाजीचा निर्माण झाला आहे.

भारत टी20 विश्वचषकात जसप्रीत बुमराह आणि रविंद्र जडेजा यांच्याशिवाय खेळणार आहे. यामुळे भारताच्या गोलंदाजी अटॅकवर याचा थोडा परिणाम दिसण्याची शक्यता आहे. बुमराहच्या जागी मुख्य संघात शमीची वर्णी लागली आहे. आयसीसीने वेगवान गोलंदाजांमध्ये भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंग आणि हर्षल पटले यांना घेतले आहे.

शमी, पंत आणि अश्विन यांच्या प्रमाणेच दीपक हुड्डा यालाही अंतिम अकरामध्ये आयसीसीने स्थान दिले नाही.

आयसीसीने निवडलेली भारताची पाकिस्तान विरुद्ध प्लेईंग इलेवन-
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), अक्षर पटेल, हर्षल पटेल, भुवनेश्वर कुमार, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
वाढदिवस विशेष- सहा चेंडूत सहा षटकार खेचणाऱ्या शार्दुल ठाकुरविषयी काही खास माहिती
आता दादा उतरणार निवडणुकीच्या रिंगणात! स्वतः दिली माहिती

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---