भारतीय संघाचा विस्फोटक फलंदाज सूर्यकुमार यादव याची बॅट 2022 या वर्षात आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये शांत बसण्याचं नाव घेत नाहीये. सूर्यकुमार याने टी20 विश्वचषक 2022मध्येही आपल्या फलंदाजीचा दम दाखवून दिला आहे. त्याने सुपर 12 फेरीत खेळलेल्या 5 सामन्यात 193.96च्या स्ट्राईक रेटने 225 धावा चोपल्या आहेत. त्याने रविवारी (दि. 06 नोव्हेंबर) मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर झिम्बाब्वेविरुद्ध नाबाद 61 धावांची खेळीही साकारली. त्याच्या खेळीमुळे भारतीय संघाला मोठे आव्हान उभे करता आले. या सामन्यात विजय मिळवल्यानंतर कर्णधार रोहित शर्मा हादेखील त्याच्या फलंदाजीने प्रभावित झाला. त्याने सूर्याचे तोंडभरून कौतुक केले आहे.
भारतीय संघाने दिलेले 187 धावांचे आव्हान पार करताना झिम्बाब्वे संघाचा डाव फक्त 115 धावांवरच संपुष्टात आला. त्यामुळे भारताने 71 धावांनी विजय मिळवला. या विजयानंतर रोहित शर्मा (Rohit Sharma) याने सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) याची प्रशंसा केली.
A quick-fire half-century for @surya_14kumar off 23 deliveries.
This is his 12th FIFTY in T20Is.
Live – https://t.co/lWOa4COtk9 #INDvZIM #T20WorldCup pic.twitter.com/KgSARK034S
— BCCI (@BCCI) November 6, 2022
सूर्यकुमारविषयी रोहितचे मोठे वक्तव्य
रोहित म्हणाला की, “तो संघासाठी जे काही करत आहे, ते प्रशंसेयोग्य आहे. फलंदाजी करण्यासोबतच इतर खेळाडूंवरील दबाव दूर करणे हे संघाच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाचे आहे. आम्हाला त्याची क्षमता माहितीये आणि त्याच्यामुळे इतर फलंदाजांना वेळही मिळतो. जेव्हा तो फलंदाजी करतो आणि तो जो आत्मविश्वास दाखवतो, त्यामुळे डगआऊटमध्येही आरामदायी वातावरण असते. त्याने खूप संयम दाखवलाय. ही अशी गोष्ट आहे, ज्याची आम्ही त्याच्याकडून अपेक्षा करतो आणि तो आपल्या ताकदीनिशी खेळत आहे.”
सूर्यकुमा यादव याने या टी20 विश्वचषक 2022 (T20 World Cup 2022) स्पर्धेमध्ये शानदार फलंदाजी केली आहे. तो या टी20 विश्वचषकात सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत अव्वल तीनमध्ये पोहोचला आहे. विराट या यादीत 246 धावांसोबत पहिल्या स्थानावर आहे, तर सूर्यकुमारच्या 225 धावा आहेत.
झिम्बाब्वेविरुद्ध सूर्याने रचला इतिहास
भारतीय संघाचा दमदार फलंदाज सूर्यकुमार यादव याने झिम्बाब्वेविरुद्ध नाबाद 61 धावांची खेळी साकारत इतिहास रचला. त्याने एका कॅलेंडर वर्षात आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये 1000 धावा पूर्ण केल्या आहेत. अशी कामगिरी करणारा तो पहिला भारतीय फलंदाज बनला आहे. इतकेच नाही, तर तो जागतिक क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा मोहम्मद रिझवान याच्यानंतरचा दुसरा फलंदाज बनला आहे. मोहम्मद रिझवान याने मागील वर्षी म्हणजेच 2021मध्ये 1000 धावांचा आकडा पार केला होता.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
क्रिकेटर नसता तर सूर्यकुमारने ‘या’ क्षेत्रात कमावले असते नाव, स्वतःच केलेला खुलासा
‘सूर्य’ पुन्हा तळपला, वादळी अर्धशतकासह मोठा विक्रम नावावर; ठरलाय एकटाच भारतीय