भारत विरुद्ध पाकिस्तान (INDvPAK)यांच्यात टी20 विश्वचषक (T20 World Cup) 2022चा सुपर 12चा सामना खेळला जाणार आहे. रविवारी (23 ऑक्टोबर) मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर हा सामना खेळला जाणार आहे. या सामन्यासाठी दोन्ही देशाचे चाहते चांगलेच उत्सुक असून क्रिकेटविश्वताही एक वेगळेच वातावरण निर्माण झाले आहे. स्थानिक हवामानाच्या रिपोर्ट्सनुसार आता या सामन्यावरील पावसाचे सावट दूर झाले आहे. यामुळे चाहत्यांचा उत्तम सामना पाहायला मिळणार आहे. या सामन्यात कोणता संघ वरचढ हे जाणून घेऊया.
मागील टी20 विश्वचषकाचा सामना कोणताच भारतीय प्रशसंक विसरणार नाही, कारण तेव्हा पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी याने भारताची वरची फळी पूर्णपणे उधवस्त केली होती. भारताने तो सामना 10 विकेट्सने गमावला होता. तो भारताचा टी20 विश्वचषकात पाकिस्तानविरुद्धचा पहिला पराभव होता.
नुकत्याच झालेल्या आशिया चषकातही हे संघ दोन वेळा समोरा-समोर आले. तेव्हा दोघांनी प्रत्येकी एक-एक सामना जिंकला, यावरूनच रोहित शर्मा एँड टीम इंडिया पाकिस्तानचा हा विक्रम पाहून त्याच्याविरुद्ध जिंकणे तितेकच सोप्यात घेणार नाही.
क्रिकेटच्या या छोट्या प्रकारामध्ये भारत-पाकिस्तान आतापर्यंत 11 वेळा आमने-सामने आले. ज्यामध्ये सातवेळा भारत विजेता ठरला. पाकिस्तानला केवळ तीनच सामने जिंकला आले. यातील दोन सामने पाकिस्तानने बाबर आझम (Babar Azam) याच्या नेतृत्वाखाली जिंकले. एक सामना बरोबरीत सुटला होता त्याचा निकाल बॉल-आऊटमध्ये लागला होता, त्यामध्ये भारत जिंकला होता.
2021च्या टी20 विश्वचषकानंतर भारत-पाकिस्तान 2022च्या आशिया चषकात भिडले. त्यामधील पहिल्या सामन्यात भारताने पाकिस्तानचा 5 विकेट्सने परावभ केला होता. त्याच स्पर्धेत सुपर 4च्या सामन्यात पाकिस्तानने भारताला 5 विकेट्सने पराभूत करत 1-1 अशी बरोबरी साधली. याव्यतिरिक्त पाकिस्तानने 2012मध्ये भारताचा दौरा केला होता. त्यामधील एका टी20 सामन्यात पाकिस्तान 5 विकेट्सने जिंकला होता. हा सामना बंगलोरमध्ये झाला होता.
रोहित शर्मा प्रथमच एखाद्या आयसीसी स्पर्धेत भारताचे नेतृत्व करणार आहे. मागील एक वर्षात त्याच्या नेतृत्वाखाली भारताने अनेक टी20 मालिका जिंकल्या आहेत. यामुळे तो विश्वचषकात कसे पदार्पण करतो याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.
टी20 विश्वचषकासाठी संभाव्य प्लेईंग इलेव्हन
भारतीय संघ –
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल , विराट कोहली, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत/अक्षर पटेल, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, युझवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग.
पाकिस्तानचा संघ-
बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), शान मसूद, शादाब खान, मोहम्मद नवाज, हैदर अली, इफ्तिखार अहमद, आसिफ अली, नसीम शाह, हॅरिस रउफ, शाहीन शाह आफ्रिदी.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘त्या’ चार चेंडूंनी बदलले पानटपरीवाल्याच्या मुलाचे नशीब, विश्वचषक तर जिंकून दिलाच शिवाय केली देशाची अशाप्रकारे सेवा
भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यापूर्वी धोनीचे वक्तव्य चर्चेत; म्हणाला, ‘मी विश्वचषक खेळत नाहीये’
प्रो कबड्डी: मुंबईचा धसमुसळ्या खेळाने मानहानीकारक पराभव; जयपूरने उडवली टायटन्सची दाणादाण