---Advertisement---

मेलबर्नवरून आनंदाची बातमी, भारत-पाकिस्तान सामन्यावरील संकटाचे ढग दूर!

Rohit-Sharma-Babar-Azam
---Advertisement---

टी20 विश्वचषक (T20 World Cup) 2022च्या स्पर्धेत भारताचा सुपर 12चा पहिला सामना पाकिस्तानविरुद्ध (INDvPAK)आहे. हा सामना रविवारी (23 ऑक्टोबर) मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर खेळला जाणार आहे. या सामन्यात पाऊस पडणार आणि सामना रद्द होणार या चर्चांना उधान आले होते. ऑस्ट्रेलियातील वातावरण पाहिले तर काही सराव सामने पावसामुळे रद्दही झाले होते. यामुळे हा अंदाज खरा ठरतो की काय अशी भीती दोन्ही संघाच्या चाहत्यांमध्ये निर्माण झाली होती, मात्र आता संकटाचे ढग दूर होताना दिसत आहेत.

ताज्या हवामान रिपोर्टनुसार, रविवारी पडणाऱ्या पावसाची संभावना आता 20 टक्क्यांवर आली आहे. दोन दिवसांपूर्वीच्या रिपोर्टनुसार रविवारी 96 टक्के पावसाचा अंदाज वर्तवला होता. शनिवारी (22 ऑक्टोबर) वातावरण स्वच्छ दिसले आहे. यामुळे रविवारीही असेच वातावरण असण्याची शक्यता हवामान विभागाने दर्शवली आहे. तसेच भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशी थोडा पाऊस पडेल मात्र सामना संपूर्ण खेळला जाईल अशी अपेक्षा आहे.

पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याबाबत भारताचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) म्हणाला, “सर्वांनाच 40 षटकांचा सामना पाहण्याची इच्छा आहे, कारण सगळ्या चाहत्यांनी 20-20 षटकांचा सामना पाहण्यासाठीच तिकीटे खरेदी केली आहेत. मात्र सामना 10-10 किंवा अधिक कमी षटकांचा झाला तरीही आम्ही त्यासाठी तयारच आहोत.”

भारताच्या खेळाडूंनी पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याआधी शेवटची नेट प्रॅक्टिस केली आहे. त्यामध्ये मेलबर्नमध्ये ऊन पडल्याचे स्पष्ट दिसत आहे. यामुळे क्रिकेटविश्वतील हा हायव्होल्टेज सामना रविवारी चाहत्यांना पाहायला मिळणार आहे. रोहित पहिल्यांदाच आयसीसी स्पर्धांमध्ये भारताचे नेतृत्व करणार आहे. मागील काही टी20 मालिकांमध्ये रोहितच्या नेतृत्वाखाली भारताच्या संघात अनेक बदल पाहायला मिळाले आहेत. त्यामुळे भारत पाकिस्तानविरुद्ध कसा खेळ करेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

जसप्रीत बुमराह याच्या अनुपस्थितीत मोहम्मद शमी संघात आला आहे. शमी थेट 2021च्या टी20 विश्वचषकानंतर आता खेळणार आहे. तसेच त्याने सराव सामन्यात एक षटक टाकताना एक धावबाद आणि तीन विकेट्सही घेतल्या होत्या.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
कॅप्टन रोहितचे स्पष्टीकरण! सांगितले, टीम इंडिया 2021च्या टी20 विश्वचषकापासून कशी चेंज झाली
अक्षर अन् अश्विनमध्ये कुणाचं पारडं जड? अशी असू शकते टीम इंडियाची प्लेइंग इलेव्हन

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---