सन 1992 प्रमाणे विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न उराशी बाळगणाऱ्या पाकिस्तान संघाची खूपच निराशा झाली. टी20 विश्वचषक 2022 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात इंग्लंड संघाने पाकिस्तानला 5 विकेट्सने पराभूत केले. पाकिस्तानचा पराभव होऊनही पाकिस्तानी पत्रकार एहतिशाम उल हक याने आपल्या संघाच्या गोलंदाजांची प्रशंसा केली. यावर आता पाकिस्तानी पत्रकाराला दिलेले अमित मिश्राचे प्रत्युत्तर सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मिश्राने मजेशीररीत्या पाकिस्तानी पत्रकाराची खिल्ली उडवली.
खरं तर, विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात पाकिस्तान संघाने इंग्लंडला 138 धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडला पाकिस्तानच्या गोलंदाजांनी चिंतेत टाकले होते. तसेच, आव्हान गाठण्यात अडथळा निर्माण केला होता. अशात पाकिस्तानी पत्रकाराने गोलंदाजांबद्दल त्याच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून एक ट्वीट केले. यामध्ये त्याने लिहिले की, “पाकिस्तानी गोलंदाज जगात सर्वात भारी आहेत.”
Pakistani bowlers are the best in the world!!! #T20WorldCup
— Ihtisham Ul Haq (@iihtishamm) November 13, 2022
या ट्वीटवर एका चाहत्याने म्हटले की, “जर असे असते, तर झिम्बाब्वेविरुद्धचा सामना का हारला?” दुसऱ्या एकाने म्हटले की, “पाकिस्तान तर उपांत्य सामन्यातही नशिबाने पोहोचला होता. अशात त्यांनी जास्त बोलले नाही पाहिजे.” यावर अमित मिश्रा (Amit Mishra) यानेही प्रत्युत्तर दिले आहे.
अमित मिश्रा याने पाकिस्तानी पत्रकाराच्या ट्वीटला प्रत्युत्तर दिले आणि एक फोटो आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला. हा फोटो विराट कोहली (Virat Kohli) याचा होता. यावर अमित मिश्राने लिहिले होते की, “तुम्ही सर्वोत्तम असे म्हणालात का?” अमित मिश्रा त्याच्या ट्वीटमार्फत विराटने केलेल्या पाकिस्तानी गोलंदाजांच्या धुलाईची आठवण करून देत आहे.
Did you say best? https://t.co/dboAELlYKH pic.twitter.com/64sYkyuXEH
— Amit Mishra (@MishiAmit) November 13, 2022
अमित मिश्राच्या या ट्वीटवर चाहत्यांमध्येही दोन गट पडले. काही चाहत्यांनी असे म्हटले की, पाकिस्तानकडे खरंच चांगले गोलंदाज आहेत आणि भारतीय गोलंदाजांनी त्यांच्याकडून शिकले पाहिजे. दुसरीकडे, काही युजर्सने अमित मिश्राच्या या प्रत्युत्तराची प्रशंसा केली. ते म्हणत आहेत की, “नशीबाने मिळालेल्या विजयावर एवढी गर्व केला नाही पाहिजे, नाहीतर तेच होते, जे पाकिस्तानसोबत अंतिम सामन्यात झाले.”
अमित मिश्राचे हे ट्वीट जोरदार व्हायरल होत असून यावर आता वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. (t20 world cup 2022 indian bowler amit mishra s befitting reply to a pakistani journalist goes to viral)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
विश्वचषक तर जिंकलाच, पण आता आयपीएलही जिंकायला निघाला इंग्लंडचा ‘हा’ पठ्ठ्या; म्हणाला, ‘मी आता…’
फायनलमध्ये पाकिस्तानची दाणादाण उडवणाऱ्या करनला पाँटिंगने म्हटले ‘बॉलर ऑफ द टूर्नामेंट’, पण का?