आयसीसी टी-20 विश्वचषक 2022 मध्ये बारततीय संघ उपांत्य फेरीत पराभूत झाला. गुरुवारी (10 नोव्हेंबर) भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात टी-20 विश्वचषकाचा दुसरा उपांत्य सामना खेळला गेला. या सामन्यात भारतीय गोलंदाजांना एकही विकेट मिळाली नाही आणि कर्णधार रोहित शर्मा याच्यावर देखील मोठ्या प्रमाणात टीका केली गेली. अनेकजण रोहितच्या नेतृत्वावर नाराज असल्याचे दिसत आहे. अशात भारताचा माजी कर्णधार एमएस धोनी याची चाहत्यांना आठवण येणे सहाजिक आहे. सोशल मीडियावर सर्वत्र एमएस धोनी व्हायरल होताना आपण पाहू शकतो.
#INDvsENG
We miss uh dhonii. 🥺🥺#dhoni #T20Iworldcup2022 #Shame pic.twitter.com/zkLSXSybNN— Anuj Saharan (@saharan_anuj_) November 10, 2022
कोई पूछे तो बता देना एक था जो स्टंप के पीछे से मैच पलट देता था###MSDHONI pic.twitter.com/haAVkNCQ1j
— Zahid Ali (@ZahidAl88139235) November 11, 2022
भारतीय संघाचा माजी दिग्गज वेगवान गोलंदाज आशीष नेहरा (Ashish Nehra) याचा एक व्हिडिओ देखील चांगलाच व्हायरल होत आहे. नेहरा या व्हिडिओत एमएस धोनी (MS Dhoni) संघात नसताना त्याची कमी समजू शकते, असे म्हणताना दिसत आहे. हा व्हिडिओ जरी जुना असला, तरी चाहत्यांनी तो गुरुवारच्या सामन्यानंतर ट्रेंटिंगला आणला आहे. धोनी भारतीय संघाच्या सर्वोत्तम कर्णधारांपैकी एक मानला जातो. त्याच्या नेतृत्वात भारताने आयसीसीच्या तिन्ही महत्वाच्या स्पर्धा जिंकल्या आहेत. 2007 मध्ये धोनीने भारताला टी-20 विश्वचषक जिंकवून दिला, त्यानंतर 2011 मध्ये त्याच्याच नेतृत्वात संघाने आयसीसीचा एकदिवसीय विश्वचषक जिंकला.
Yesterday I was missing MS . Dhoni in the field. #MSDhoni #CricketWorldCup
— prince Khan (@Prince_rekib_29) November 11, 2022
wapas ajaao Mahi.😭🤌 @msdhoni #IndianCricketTeam #MSDhoni #Cruze #Cultclassic pic.twitter.com/TrBj8MhuNu
— GoMechanic Workshops (@GoMechanic_Blog) November 11, 2022
धोनीने भारताला 2013 मध्ये खेळल्या गेलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीतही भारताला विजेतेपद मिळवून दिले होते. अशात यावर्षीच्या टी-20 विश्वचषकात मिळालेल्या पराभवानंतर चाहत्यांना त्याची आठवण येत आहे. खासकरून उपांत्य सामन्यात इंग्लंडने 10 विकेट्स राखून मात दिल्यामुळे चाहते जास्तच नाराज आहेत. या सामन्यात संघात चांगल्या गोलंदाजांसोबत एका चांगल्या नेतृत्वाची देखील उणीव जाणवली. सोशल मीडियावर चाहते धोनीला मीस करताना दिसता. धोनीच्या अनेक पोस्ट आणि व्हिडिओ व्हायरल होत आहेत.
https://twitter.com/kohlifanAmee/status/1590659708947288064?s=20&t=eQqPQuEqsJQP-KwgZfI3UQ
No Captain can Match his level.
There is no another MS Dhoni In india. pic.twitter.com/mBszHmut4D
— MAHIYANK™ (@Mahiyank_78) November 10, 2022
दरम्यान, भारत आणि इंग्लंड यांच्यात गुरुवारी खेळल्या गेलेल्या उपांत्य सामन्याचा विचार केला, तर भारताने नाणेफेक जिंकल्यानंतर प्रतम फलंदाजी केली. 20 षटकांच्या या सामन्यात भारतने 6 विकेट्सच्या नुकसानावर 168 धावा केल्या. प्रत्युत्तरात इंग्लंडने हे लक्ष्य अवघ्या 16 षटकांमध्ये एकही विकेट न गमावता गाठले. (t20 world cup 2022 indian fans missing ms dhoni after defeat against england in semi final)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
मोठ्या टी20 स्पर्धांमध्ये भारताचे अपयश पाहून दिग्गज खेळाडूने दिला सल्ला; म्हणाला, ‘आता द्रविडला…’
इंग्लंडसाठी टी20मध्ये खेळल्या गेलेल्या 5 सर्वात मोठ्या सलामी भागीदाऱ्या, ‘हा’ पठ्ठ्या सगळ्यात सामील