भारतीय संघाचा टी20 विश्वचषक 2022 स्पर्धेतील प्रवास संपला आहे. भारताला दुसऱ्या उपांत्य सामन्यात इंग्लंड संघाने 10 विकेट्सने पराभूत करत स्पर्धेबाहेर फेकले आहे. तसेच, स्वत: अंतिम सामन्यात पाकिस्तानविरुद्ध भिडण्यासाठी सज्ज झाले आहेत. अशात इंग्लंडविरुद्ध पराभूत झाल्यानंतर इंग्लंड संघाचे माजी कर्णधार मायकल वॉन यांनी भारतावर सडकून टीका केली आहे. ते म्हणाले आहेत की, क्रिकेटच्या इतिहासात भारतीय संघ सर्वात खराब कामगिरी करणारा संघ आहे.
मायकल वॉन यांची सडकून टीका
मायकल वॉन (Michael Vaughan) यांनी भारतावर टीका करत म्हटले की, टी20 विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघ जुन्या शैलीचे क्रिकेट खेळला. वॉन यांनी एका वृत्तसंस्थेसाठी लिहिलेल्या स्तंभामध्ये म्हटले की, “भारतीय संघ इतिहासात सर्वात खराब प्रदर्शन करणारा मर्यादित षटकांचा संघ आहे. प्रत्येक खेळाडू जो इंडियन प्रीमिअर लीग स्पर्धेत खेळायला जातो, तो म्हणतो की, यामुळे त्यांच्या खेळात किती सुधारणा झाली. मात्र, भारताने यामधून काय मिळवलं?”
ते म्हणाले, “2011मध्ये घरच्या मैदानावर 50 षटकांचा विश्वचषक जिंकल्यानंतर त्यांनी काय केलंय? काहीच नाही. भारत मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये जुन्या शैलीचे क्रिकेट खेळत आहे, जे त्यांनी मागील अनेक वर्षांपासून खेळले आहे.”
पंतविषयी वक्तव्य
वॉन यांनी रिषभ पंत याला संघात सामील न केल्यामुळे भारतीय संघ व्यवस्थापनाला खडेबोल सुनावले. ते म्हणाले की, “त्यांनी रिषभ पंत यासारख्या खेळाडूचा भरपूर वापर केला नाही. या दौऱ्यात त्याला अव्वलस्थानी ठेवा. मी हैराण आहे की, त्याच्याकडे जी प्रतिभा आहे, तरीही तो टी20 क्रिकेट कसा खेळतो. त्यांच्याकडे खेळाडू आहेत, पण त्यांना खेळवण्यासाठी योग्य प्रक्रिया नाहीये. त्यांनी प्रतिस्पर्धी गोलंदाजांना दबाव बनवण्यासाठी पहिली पाच षटके कशी काय दिली?”
सामन्याचा आढावा
भारतीय संघाने दुसऱ्या उपांत्य सामन्यात गुरुवारी (दि. 10 नोव्हेंबर) ऍडलेड येथे इंग्लंडचा सामना केला. यावेळी भारताने पहिल्यांदा फलंदाजी करताना 6 विकेट्स गमावत 168 धावा चोपल्या होत्या. हे आव्हान इंग्लंड संघाच्या खेळाडूंनी एकही विकेट न गमावता 170 धावा चोपत पूर्ण केले. (T20 World Cup 2022 Michael Vaughan criticises Team India read what he says)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
मोठ्या टी20 स्पर्धांमध्ये भारताचे अपयश पाहून दिग्गज खेळाडूने दिला सल्ला; म्हणाला, ‘आता द्रविडला…’
‘बिलियन डॉलर इंडस्ट्रीचा संघ मागेच राहिला अन् आम्ही…’, पीसीबी अध्यक्षांनी भारताच्या जखमेवर चोळलं मीठ