---Advertisement---

व्हिडिओ: आयर्लंडच्या गोलंदाजाविरुद्ध मार्शचा धोबीपछाड षटकार; पाहून तुम्हीही म्हणाल, ‘बापरे!’

On: सोमवार, ऑक्टोबर 31, 2022 4:33 PM
Mitchell-Marsh
---Advertisement---

टी20 विश्वचषक 2022 स्पर्धेतील 31वा सामना सोमवारी (दि. 31 ऑक्टोबर) ऑस्ट्रेलिया विरुद्ध आयर्लंड संघात पार पडला. ब्रिस्बेन येथे पार पडलेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा फलंदाज मिचेल मार्श याने रौद्र रूप धारण केले होते. मार्शने यादरम्यान शानदार फटकेबाजी केली. त्याने त्याच्या खेळीमध्ये एक उत्तुंग षटकार मारला, आता सर्वत्र त्याचीच चर्चा रंगली आहे. त्याच्या षटकाराचा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे.

मिचेल मार्शचा षटकार
या सामन्यात आयर्लंड संघाने नाणेफेक जिंकत क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला होता. यावेळी फलंदाजीला आलेल्या ऑस्ट्रेलिया संघाने निर्धारित 20 षटकात 5 विकेट्स गमावत 179 धावा चोपल्या. यादरम्यान मिचेल मार्श (Mitchell Marsh) याने फलंदाजी करताना डावाच्या सातव्या षटकातील तिसऱ्या आणि पाचव्या चेंडूवर गगनचुंबी षटकार खेचला. यावेळी त्याच्या बॅटमधून निघालेला पहिला षटकार पाहण्यासारखा होता.

गोलंदाज फियॉन हँडने मार्शच्या पट्ट्यात चेंडू फेकला, जो फलंदाजाने ताकदीने भिरकावला. मार्शने क्रीझमध्ये उभे राहूनच चेंडू जोरात मारला. हा शॉट खेळण्यासाठी मार्शने छोटी सीमारेषेला निशाणा बनवले असले, तरीही हा चेंडू तब्बल 102 मीटर लांबीचा होता. यावेळी मार्शचा षटकार पाहून समालोचकांनीही प्रशंसा केली. या सामन्यात मार्शने 22 चेंडूत 28 धावांची खेळी केली.

https://www.instagram.com/reel/CkXySr_vlXJ/?utm_source=ig_embed&ig_rid=d3e9ca72-cb13-4794-9a1e-5f38755f8c99

सामन्याबद्दल बोलायचं झालं, या सामन्यात पहिल्यांदा फलंदाजीला उतरलेल्या ऑस्ट्रेलिया संघाची सुरुवात चांगली झाली नाही. त्यांचा सलामीवीर फलंदाज डेविड वॉर्नर अवघ्या 8 धावांवर तंबूत परतला. त्यानंत तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या मार्शने कर्णधार ऍरॉन फिंच याच्यासोबत 52 धावांची शानदार अर्धशतकी भागीदारी रचली. ऑस्ट्रेलिया संघाच्या 3 विकेट्स या 84 धावांवर पडल्या होत्या. पुढे फिंचने 63 धावांची अर्धशतकी खेळी करत संघाची धावसंख्या दीडशेच्या पार पोहोचवण्यात मोलाचा वाटा उचलला. दुसरीकडे, स्टॉयनिसनेही संघाची धावसंख्या 179 करण्यात 35 धावांचे योगदान दिले.

ऑस्ट्रेलिया संघाने आतापर्यंत 3 सामने खेळले असून त्यातील एका सामन्यात विजय आणि एका सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. तसेच, एक सामना पावसामुळे रद्द झाला होता.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
रिषभ पंतने ओपनिंग केल्यानंतर बदलणार भारताचे नशीब; असं आम्ही नाही, तर पठ्ठ्याचा चाहताच म्हणतोय
कार्तिकची दुखापत गंभीर! बांगलादेशविरुद्ध पंत होणार प्लेईंग इलेव्हनमध्ये ‘इन’

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---