यंदाच्या टी20 विश्वचषकातील (T20 World Cup) 22वा सामना पाकिस्तान विरुद्ध कॅनडा (Pakistan vs Canada) यांच्यामध्ये खेळला गेला. या सामन्यात पाकिस्तान 7 विकेट्सनं कॅनडाचा पराभव केला आणि या टी20 विश्वचषकातील पहिलाच विजय मिळवला. या सामन्यात पाकिस्तानचा अनुभवी वेगवान गोलंदाज हारिस रौफनं (Haris Rauf) इतिहास रचला.
पाकिस्तानच्या या वेगवान गोलंदाजानं यंदाच्या टी20 विश्वचषकात मुसंडी मारली. कॅनडा विरुद्धच्या सामन्यात हारिस रौफनं वेगवान गोलंदाज म्हणून टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 100 विकेट्सचा टप्पा पूर्ण केला. हारिस रौफ (Haris Rauf) टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यात सर्वात जलद 100 विकेट्स पूर्ण करणारा पहिला गोलंदाज ठरला.
हारिस रौफनं (Haris Rauf) कॅनडा विरुद्धच्या सामन्यात 4 ओव्हरमध्ये 26 धावा खर्च करुन 2 विकेट्स मिळवल्या. त्यानं कॅनडाच्या श्रेयस मोव्वाला बाद करुन टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 100 विकेट्स पूर्ण केले. त्याच ओव्हरमध्ये त्यानं रविंद्रपाल सिंहला देखील तंबूत पाठवलं.
पाकिस्तानसाठी टी20 क्रिकेटमध्ये 100 विकेट्स घेणाऱ्या शादाब खान (Shadab Khan) नंतर हारिस रौफ पाकिस्तानसाठी 100 विकेट्स घेणारा दुसरा गोलंदाज ठरला. परंतु टी20 क्रिकेटमध्ये वेगवान गोलंदाजांमध्ये सर्वात जलद 100 विकेट घेणारा तो पहिला गोलंदाज बनला आहे.
सर्वात जलद टी20 क्रिकेटमध्ये 100 विकेट्स घेणारे वेगवान गोलंदाज- 1) 71 सामने हारिस रऊफ (पाकिस्तान) 2) 72 सामने मार्क अडायर (आयर्लंड) 3) 72 सामने बिलाल खान (ओमान) 4) 76 सामने लसिथ मलिंगा 5) 81 सामने मुस्तफिजुर रहमान
सर्वात जलद टी20 क्रिकेटमध्ये 100 विकेट्स घेणारे गोलंदाज- 1) 53 सामने राशिद खान ( 2) 63 सामने वानिंदु हसरंगा (श्रीलंका) 3) 71 सामने हारिस रऊफ (पाकिस्तान) 4) 72 सामने मार्क अडायर (आयर्लंड) 5) 72 सामने बिलाल खान (ओमान)
महत्त्वाच्या बातम्या-
अफगाणिस्तानच्या दिग्गज खेळाडूनं ICC रँकिंगमध्ये रचला इतिहास! हार्दिक पांड्यालाही फायदा, शाकीब अल हसनचं नुकसान
ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फिरकीपटू, यंदाच्या टी20 विश्वचषकात दाखवतोय जादू!
टीम इंडियाला अमेरिकेच्या ‘या’ 5 खेळाडूंपासून सावध राहावं लागेल, अन्यथा होईल पाकिस्तानसारखी स्थिती!