यंदाच्या आयसीसी टी20 विश्वचषकातील (ICC T20 World Cup) 25वा सामना आज (12 जून) रोजी भारत विरुद्ध अमेरिका यांच्यामध्ये खेळला गेला. न्यूयाॅर्कच्या नासाउ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर हा सामना रंगला होता. भारतानं या सामन्यात विजयाची हॅट्रिक लगावली. यजमान अमेरिकेचा 7 विकेट्सनं दारुण पराभव केला.
111 धावांचा पाठलाग करताना भारताकडून अनुभवी खेळाडू सूर्यकुमार यादवनं (Suryakumar Yadav) अर्धशतकी खेळी खेळली. त्यानं 49 चेंडूत 50 धावा ठोकल्या. यादरम्यान त्यानं 2 चौकांरांसह उत्तुंग 2 षटकार लगावले. तर शिवम दुबेनं (Shivam Dube) 35 चेंडूत 31 धावांची खेळी केली आणि रिषभ पंतच्या (Rishabh Pant) 18 धावांच्या खेळीनं भारतानं 111 धावांचं आव्हान पूर्ण केलं. अमेरिकेसाठी सौरभ नेत्रावळकरनं (Saurabh Netravalkar) 2 विकेट्स घेतल्या. तर अली खाननं (Ali Khan) 1 विकेट घेतली.
तत्पूर्वी भारतानं टाॅस जिंकून अमेरिकेला फलंदाजीसाठी पाचारण केलं होतं. प्रत्युत्तरात अमेरिकेन 8 गडी गमावून 110 धावा केल्या. नासाउ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर गोलंदाजांना जास्त मदत मिळत असल्या कारणानं या मैदानावर जास्त धावा पाहायला मिळाल्या नाहीत.
अमेरिकेसाठी नितीश कुमारनं (Nitish Kumar) 23 चेंडूत सर्वाधिक 27 धावा केल्या. तर सलामीवीर स्टीव्हन टेलरनं (Steven Taylor) 30 चेंडूत 24 धावा ठोकल्या. भारतासाठी प्रतिभावान वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगनं (Arshdeep Singh) 4 विकेट्स त्याच्या नावी केल्या. हार्दिक (Hardik Pandya) पांड्यानं 2 तर अक्षर पटेलनं (Axar Patel) 1 विकेट घेतली आणि संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली.
दोन्ही संघांच्या प्लेइंग 11
भारत- रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, रिषभ पंत (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज
अमेरिका- स्टीव्हन टेलर, शायन जहांगीर, अँड्रिस गॉस (यष्टीरक्षक), आरोन जोन्स (कर्णधार), नितीश कुमार, कोरी अँडरसन, हरमीत सिंग, शॅडली व्हॅन शाल्कविक, जसदीप सिंग, सौरभ नेत्रावळकर, अली खान
महत्त्वाच्या बातम्या-
अमेरिकेनं भारतासमोर ठेवलं 111 धावांचं आव्हान!
नाद करा, पण विराटचा कुठं! आफ्रिदीचा विक्रम मोडला, आता नंबर धोनीचा
बाबर आझमने आयसीसी टी20 क्रमवारीत घेतले झेप, संघाची कामगिरी मात्र खराबच