---Advertisement---

अमेरिका विरुद्ध आयर्लंड सामना पावसामुळे रद्द, सुपर 8 साठी अमेरिका क्वालिफाय

On: शुक्रवार, जून 14, 2024 11:27 PM
AMERICA
---Advertisement---

यंदाच्या आयसीसी टी20 विश्वचषकातील (ICC T20 World Cup) आज (14 जून) रोजी 30वा सामना खेळला जाणार होता. परंतु अमेरिका (USA) विरुद्ध आयर्लंड (IRE) हा सामना सेंट्रल ब्रॉवर्ड रीजनल पार्क स्टेडियम टर्फ ग्राउंड, लॉडरहिल, फ्लोरिडा या मैदानावर पावसामुळे रद्द करण्यात आला. आणि यासोबतच अमेरिका संघानं यंदाच्या टी20 विश्वचषकात सुपर 8 साठी क्वालिफाय केलं.

अमेरिका संघानं यंदाच्या टी20 विश्वचषकात चमकदार कामगिरी केली. टी20 विश्वचषकाच्या शुभारंभ सामन्यात त्यांनी कॅनडाचा धुव्वा उडवला होता. तर दुसऱ्या सामन्यात पाकिस्तान सारख्या चॅम्पियन संघाला अमेरिकेनं धूळ चारली. अमेरिकेचा साखळी फेरीचा तिसरा सामना भारतीय संघासोबत होणार होता. परंतु भारताकडून त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.

फ्लोरिडामध्ये अमेरिका आणि आयर्लंड सामन्यापूर्वी पावसानं हजेरी लावली होती. पाउस थांबल्यानंतर खूप वेळा ग्राउंडचं निरीक्षण करण्यात आलं. परंतु पावसानं पुन्हा खोळंबा घातला आणि नंतर पंचांनी हा सामना अखेर रद्द करण्याचा निर्णय घेतला.

अमेरिका आणि आयर्लंड संघाला पावसानं खोळंबा घातला असल्या कारणानं 1-1 गुण देण्यात आला. यंदाच्या टी20 विश्वचषकात अमेरिका ग्रुप-अ मध्ये समाविष्ट आहे. ग्रुप-अ च्या गुणतालिकेत भारतीय संघानं विजयाजी हॅट्रिक लगावली आणि सुपर 8 साठी क्वालिफाय केलं. तर अमेरिकेनं 5 गुणांसह यंदाच्या टी20 विश्वचषकात सुपर 8 साठी क्वालिफाय केलं आणि पाकिस्तान संघाच्या सुपर 8 मध्ये क्वालिफाय होण्याच्या सर्व आशा संपुष्टात आणल्या. यंदाच्या टी20 विश्वचषकातून पाकिस्तानचा संघ बाहेर पडला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

अफगाणिस्तानसह ‘हे’ संघ सुपर-8 साठी पात्र, न्यूझीलंड-श्रीलंका विश्वचषकातून आउट!
टी20 विश्वचषकातील खराब कामगिरीमुळे, विराटच्या नावी लज्जास्पद विक्रमाची नोंद!
अशी आहेत पाकिस्तानसाठी ‘क्वालिफाय’ समीकरणे, पाहा कोणत्या संघाचा होणार पत्ता कट

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---