यंदाच्या आयसीसी टी20 विश्वचषकातील (ICC T20 World Cup) 24वा सामना ऑस्ट्रेलिया विरुद्ध नामिबिया (AUS vs NAM) यांच्यामध्ये खेळला गेला. या सामन्यात ऑस्ट्रेलियानं नाणेफेक जिंकून नामिबियाला फलंदाजीसाठी पाचारण केलं होतं. प्रत्युत्तरात नामिबिया संघ सर्वबाद 72 धावाच करु शकला. ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी या सामन्यात आक्रमक गोलंदाजी केली. संघाचा अनुभवी फिरकीपटू ॲडम झम्पानं (Adam Zampa) त्याच्या फिरकीची जादू दाखवत 12 धावा खर्च करुन 4 विकेट्स घेतल्या.
ॲडम झम्पानं (Adam Zampa) नामिबियाच्या फलंदाजांना डोकंच वर काढू दिलं नाही. त्यानं 4 फलंदाजांना तंबूत पाठवले. झम्पाच्या फिरकीच्या जादूनं जेन ग्रीन 1 धाव करुन तर डेव्हिड वीजे, रुबेन ट्रंपेलमॅन आणि बर्नार्ड स्कोल्झ हे फलंदाज 1, 7, 0 अशा धावा करुन तंबूत परतले. यादरम्यान झम्पाने गोलंदाजी करताना 3 धावांच्या इकाॅनाॅमी रेटसहित केवळ 12 धावा खर्च केल्या. तर ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज जोश हेझलवूड आणि मार्कस स्टाॅयनिसनं प्रत्येकी 2-2 विकेट्स घेत संघाच्या विजयाच महत्वाची भूमिका बजावली.
यंदाच्या टी20 विश्वचषकात झम्पानं 3 सामन्यात 8 विकेट्स त्याच्या नावी केल्या आहेत. याआधी ओमानविरुद्धच्या सामन्यात त्यानं 2 विकेट्स मिळवल्या होत्या. त्यानंतर इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात झम्पानं उत्कृष्ट गोलंदाजी करुन 4 षटकात 28 धावा खर्च करुन 2 विकेट्स घेतल्या.
यंदाच्या टी20 विश्वचषकात सर्वाधिक विकेट्स घेण्याच्या यादीत ॲडम झम्पा (Adam Zampa) 8 विकेट्स घेऊन तिसऱ्या स्थानी आहे. तर अफगाणिस्तानचा वेगवान गोलंदाज फझलहक फारुकी (Fazalhaq Farooqi) 9 विकेट्स घेऊन शीर्ष स्थानी आहे. दक्षिण आफ्रीकेचा अनुभवी वेगवान गोलंदाज एनरिक नाॅर्टजे (Anrich Nortje) 8 विकेट्स पटकावून तिसऱ्या स्थानी आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
नामिबियाच्या कर्णधारानं केला लाजिरवाणा विक्रम, टी20 क्रिकेटमध्ये असं पहिल्यांदाच घडलं!
किंग कोहलीला टी20 मध्ये 14 वर्षे पूर्ण जाणून घ्या, विराटची बहुमोल कामगिरी!
कोण आहे पाकिस्तानविरुद्ध दमदार फलंदाजी करणारा ॲरॉन जॉन्सन? कॅनडाच्या खेळाडूबद्दल मनोरंजक गोष्टी जाणून घ्या