भारतानं यंदाच्या आयसीसी टी20 विश्वचषकाच्या (ICC T20 World Cup) ट्राॅफीवर नाव कोरले. जेव्हा संघ चॅम्पियन म्हणून परतला तेव्हा त्यांचे प्रथम दिल्लीत आणि नंतर मुंबईत ऐतिहासिक स्वागत झाले. त्यानंतर, जेव्हा क्रिकेटपटू आपापल्या मूळच्या शहरात परतले तेव्हा चाहत्यांनी तिथेही त्यांचे जोरदार स्वागत केले. खेळाडूंनीही वेगवेगळ्या पद्धतीने आपला विजय साजरा केला. परंतू यादरम्यान रवींद्र जडेजासारख्या (Ravindra Jadeja) काही खेळाडूंनी हा विजय त्यांच्या आईला समर्पित केला.
रवींद्र जडेजाने (Ravindra Jadeja) मंगळवारी (16 जुलै) रोजी फेसबुक आणि इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये जडेजा त्याच्या आईसोबत आहे. त्याने एका हातात ट्रॉफी आणि दुसऱ्या हाताने आईला धरले आहे. जडेजाने या पोस्टमध्ये लिहिले आहे की, “मी मैदानावर जे काही करतो ते तुला समर्पित आहे.”
View this post on Instagram
जडेजा हा देशातीलच नव्हे तर जगातील सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडूंपैकी एक आहे. टी20 विश्वचषक जिंकल्यानंतर त्याने आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटच्या फाॅरमॅटमधून निवृत्ती घेतली आहे. रवींद्र जडेजा हा एकमेव क्रिकेटर नाही ज्याने विश्वचषक विजय आपल्या आईला समर्पित केला. मोहम्मद सिराजही (Mohammed Siraj) चॅम्पियन बनल्यानंतर पहिल्यांदा घरी पोहोचला तेव्हा त्याने आईला विश्वचषक पदक दिले.
यंदाच्या टी20 विश्वचषकात भारताचा स्टार अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) हा काही खास कामगिरी करु शकला नाही. जडेजा 35 वर्षाचा झाला आहे. रोहित शर्मा (Rohit Sharma), विराट कोहलीनंतर (Virat Kohli), त्यानंही टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केले.
महत्त्वाच्या बातम्या-
महिला आयसीसी टी20 रँकिंगमध्ये हरमनप्रीत-शफालीनं मारली मुसंडी
मोठ्या मनाचा मोठा खेळाडू! सामनावीर पुरस्कार केला चाहत्याला भेट; VIDEO एकदा पाहाच
भारताच्या माजी क्रिकेटपटूचा गडबड घोटाळा! प्रशिक्षकाच्या मदतीनं केली वयात फसवणूक