टी20 विश्वचषकाच्या रणसंग्रामाला आजपासून सुरुवात झाली आहे. पहिल्याच सामन्यात यजमान अमेरिकेने कॅनडाचा पराभव केला. स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात 40 चेंडूत 94 धावांची विस्फोटक फलंदाजी करत ॲरन जोन्स यंदाच्या विश्वचषकाला आक्रमक सुरुवात करुन दिली आहे. याआधी ऑस्ट्रेलिया संघातून एक बातमी समोर येत आहे. कर्णधार मिचेल मार्शने युगांडा संघाची जर्सी परिधान करुन संघासोबत फोटो काढताना दिसत आहे.
आयपीएलच्या प्लेऑफ आणि फायनलसाठी ऑस्ट्रेलियाचा काही खेळाडूंना वेस्ट इंडीज विरुद्धच्या सराव सामन्यास मुकावे लागले होते. पण आता सर्व खेळाडू उपल्बध झाले आहेत. त्रिनिदाद येथे सराव सामन्यात सर्व खेळाडूंनी भाग घेतले होते. यावेळी पोर्ट ऑफ स्पेन या हाॅटेल मध्ये युगांडा संघा सोबत ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मिचेल मार्श डेव्हिड वॉर्नर यांनी आपला वेळ काढून युगांडाच्या युवा संघासोबत चांगलाच वेळ घालवला.
Australia captain Mitchell Marsh and David Warner posed for photos with the players of the Uganda cricket team.
Beautiful from the Aussies👏
📸: Innocent Ndawula pic.twitter.com/aZAMyBQEs6
— CricTracker (@Cricketracker) June 2, 2024
याशिवाय, डेव्हिड वॉर्नरने खेळाडूंमध्ये मिसळून पूर्व आफ्रिकन युगांडा देशाच्या खेळाडूंसोबत फोटो काढण्यासाठी पोझ दिली. शिवाय, त्याने इतर ऑस्ट्रेलियन खेळाडूंसोबत युवा क्रिकेटपटूंच्या जर्सीवर स्वाक्षरी केली. शिवाय, मिचेल मार्श एवढ्यावरच थांबला नाही. त्याने युगांडाची जर्सी घातली, जी जवळपास ऑस्ट्रेलियाच्या किटसारखी दिसते.
युगांडा हा पूर्व आफ्रिकेतील एक देश आहे. कंपाला ही आफ्रिकेतील युगांडा ह्या देशाची राजधानी आहे. कंपालाच्या एकूण लोकसंख्येपैकी अंदाजे 60 टक्के लोक झोपडपट्ट्यांमध्ये राहतात आणि युगांडाचा वेगवान गोलंदाज जुमा मियागी या गरीब भागात झोपडपट्ट्यांमधून आपले करिअरला सुरुवात केले आहे. या खेळाडूंना प्रोत्साहन दिल्याने,संघासोबत वेळ घालवलामुळे त्यांच्या कृतीमुळे सोशल मीडियातून मिचेल मार्श, डेव्हिड वॉर्नर यांचा आदर केला जात आहे.
टी 20 विश्वचषकात ऑस्ट्रेलिया ‘ग्रुप ब’ मध्ये आहे. त्यांचा पहिला सामना 6 जून रोजी ओमान विरुद्ध खेळला जाणार आहे.
महत्तवाच्या बातम्या-
केकेआरला चॅम्पियन बनवणाऱ्या अय्यरचं झालं लग्न! सोशल मीडियावर फोटो व्हायरल
स्टीव्ह स्मिथ 35 वर्षांचा झाला, चाहत्यांनी स्टार फलंदाजाचे केले अभिनंदन!
अमेरिका-कॅनडाचा क्रिकेट इतिहास आहे 180 वर्ष जुना! ‘या’ वर्षी खेळला गेला होता पहिला सामना