आगामी टी20 विश्वचषकाची सुरुवात येत्या 2 जूनपासून होत आहे. यंदाचा टी20 विश्वचषक खूप रोमांचक होणार आहे. अमेरिका आणि वेस्ट इंडिज या दोन देशांमध्ये यंदाचा टी20 विश्वचषक खेळला जाणार आहे. सर्व संघांनी त्यांच्या 15 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. प्रत्येक संघानं अनेक नवनवीन खेळांडूंना संधी देण्यासाठी संघात समाविष्ट केलं आहे.
तत्पूर्वी, वेस्ट इंडिज संघाला मोठा झटका बसला. टी20 विश्वचषकापूर्वीच वेस्ट इंडिजचा अष्टपैलू खेळाडू अनुभवी जेसन होल्डर टी20 विश्वचषकातून बाहेर पडला. वेस्ट इंडिजला जेसन होल्डरच्या रुपात मोठा झटका लागला. वेस्ट इंडिजनं ‘X’ या सोशल मीडिया प्लॅटफाॅर्मवर एक पोस्ट शेअर करत याबाबत माहिती दिली आहे.
वेस्ट इंडिजनं सांगितलं आहे की अष्टपैलू खेळाडू जेसन होल्डर दुखापतीमुळे या स्पर्धेतून बाहेर पडला आहे. होल्डरच्या जागी त्यांनी ओबेड मेकाॅयला संघात समाविष्ट केलं आहे. यादरम्यानं वेस्ट इंडिजनं 5 राखीव खेळाडूंसह अंतिम संघाची घोषणा केली. ज्यामध्ये काही दिग्गज खेळाडूंची नावं समाविष्ट आहेत.
🚨 BREAKING NEWS🚨
🔹Obed McCoy replaces Jason Holder in the West Indies T20 World Cup Squad
🔹Reserves confirmedGet the details⬇️https://t.co/un4Sm5NlhU #WIREADY #T20WorldCup pic.twitter.com/oH450oh9Dy
— Windies Cricket (@windiescricket) May 26, 2024
तत्त्पूर्वी वेस्ट इंडिज विरुद्ध दक्षिण आफ्रिका चालू असलेल्या तीन सामन्यांच्या टी20 मालिकेत जेसन होल्डर समाविष्ट होता. रविवारी (26 मे) रोजी ही तीन सामन्यांची टी20 मालिका समाप्त झाली. परंतु आता बातमी येत आहे. की, त्याला दुखापत झाली आहे.
टी20 विश्वचषकासाठी वेस्ट इंडिजचा संघ- रोवमनं पाॅवेल (कर्णधार), जॉन्सन चार्लस, राॅस्टन चेज, शिमरन हेटमायर, शाय होप, अकेल होसेन, शेमार जोसेफ, ब्रॅन्डन किंग, ओबेड मेकाॅय, गुडाकेश मोती, निकोलस पुरन, आंद्रे रसल, शेरफेन रुदरफोर्ड, रोमरिओ शेफर्ड.
महत्त्वाच्या बातम्या-
विजयानंतर आंद्रे रसेलच्या तोंडातून शब्दचं फुटेना, भावूक होऊन म्हणाला, “या क्षणाचे वर्णन…”
शाहरुख खाननं केलं बीसीसीआयला ट्रोल, ट्रॉफी जिंकल्यानंतर मैदानावर दिलं ‘फ्लाइंग किस’; पाहा VIDEO