यंदाच्या टी20 विश्वचषकाचा शुभारंभ 2 जूनपासून होणार आहे. टी20 विश्वचषकाचा हा 9 वा हंगाम आहे. आंतरराष्ट्रीय टी20 विश्वचषकाच्या इतिहासात प्रथमच 20 संघांनी सहभाग नोंदवला आहे. या टी20 विश्वचषकाचा पहिला सामना युएसए विरुद्ध कॅनडा या दोन संघांमध्ये खेळला जाणार आहे. यंदाचा टी20 विश्वचषक अमेरिका आणि वेस्ट इंडिज या दोन देशांमध्ये खेळला जाणार आहे. तर 29 जूनला टी20 विश्वचषकाचा अंतिम सामना बार्बाडोस येथे खेळला जाईल.
परंतु टी20 विश्वचषकात असे तगडे रेकाॅर्ड आहेत, जे टी20 विश्वचषक चालू झाल्यानंतर मोडित निघू शकतात. या 9 व्या टी20 विश्वचषक हंगामातल्या 20 संघांपैकी कॅनडा, युएसए, नामीबिया, ओमान आणि नेपाळ, यांसारख्या संघांचा समावेश आहे. त्यामुळे चाहत्यांना धावांचा पाउस पाहायला मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
या संघाविरुद्ध ट्रेविस हेड, रोहित शर्मा, विराट कोहली, विल जॅक्स, जाॅनी बेयरस्टो आणि डेविड मिलर हे खेळाडू आक्रमक अंदाजात फलंदाजी करु शकतात. त्यामुळे अनेक विक्रमांना गवसणी घालण्याची या खेळाडूंना संधी आहे. या बातमीद्वारे आपण 4 रेकाॅर्डविषयी जाणून घेऊया जे, या टी20 विश्वचषकात मोडित निघू शकतात.
1. सर्वाधिक चौकार: टी20 विश्वचषकात सर्वात जास्त चौकार मारण्याच्या यादीत श्रीलंका संघाचा माजी कर्णधार माहेला जयवर्धने अव्वल स्थानी आहेत. जयवर्धने यांनी 111 चौकार लगावले आहेत. तर त्यांच्यानंतर भारतीय संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली 103 चौकारांसह दुसऱ्या स्थानी आहे. कोहलीला हे रेकाॅर्ड मोडीत काढण्यासाठी फक्त 9 चौकारांची गरज आहे.
2. जलद शतक: टी20 विश्वचषकात सर्वात जलद शतक मारण्याचं रेकाॅर्ड वेस्ट इंडिजचा विस्फोटक फलंदाज ख्रिस गेलच्या नावावर आहे. गेलनं 2016 च्या टी20 विश्वचषकात इंग्लडविरुद्ध 47 चेंडूत शतक झळकावलं होतं. परंतु आयपीएलच्या या हंगामात ट्रेविस हेड, जाॅनी बेयरस्टो आणि विल जॅक्स यांनी आक्रमक अंदाजात फलंदाजी केली. ट्रेविस हेडनं हैदराबादसाठी 39 चेंडूत शतक झळकावलं आहे, तर जाॅनी बेयरस्टोनं पंजाबसाठी 45 चेंडूत शतक झळकावलं तर विल जॅक्सनं बंगळुरुसाठी 41 चेंडूत शतक ठोकलं. त्यामुळे या टी20 विश्वचषकात हे खेळाडू नवीन रेकाॅर्ड बनवण्याचा दम ठेवू शकतात.
3. सर्वाधिक झेल: टी20 विश्वचषकात सर्वाधिक झेल पकडण्याचं रेकाॅर्ड साउथ अफ्रिकेचा दिग्गज खेळाडू एबी डिविलियर्सच्या नावावर आहे. डिविलियर्सच्या नावावर 23 झेल पकडण्याचं रेकाॅर्ड आहे. तर ऑस्ट्रेलियाचा दिग्गज खेळाडू डेविड वाॅर्नरच्या नावावर 21 झेल पकडण्याचं रेकाॅर्ड आहे.
4. सर्वाधिक धावा: एका टी20 विश्वचषकात सर्वाधिक धावा बनवण्याचा रेकाॅर्ड भारतीय संघाचा स्टार फलंदाज विराट कोहलीच्या नावावर आहे. कोहलीनं 2014 च्या टी20 विश्वचषकात 6 सामन्यांमध्ये 319 धावा बनवण्याचा विक्रम केला होता. जो अजूनही त्याच्याच नावावर आहे. परंतु कोहली या टी20 विश्वचषकात त्याचं रेकाॅर्ड स्वत: मोडीत काढू शकतो.
महत्त्वाच्या बातम्या-
टी20 विश्वचषकात सर्वाधिक धावा करण्यात ‘किंग कोहली’ अव्वल स्थानी; तर स्ट्राईक रेट बाबतीत जोस बटलर ‘टाॅपर’
भारताच्या मुख्य प्रशिक्षक पदासाठी सौरव गांगुलीनं दिली प्रतिक्रिया म्हणाला, “एखाद्याच्या आयुष्यात प्रशिक्षकाचे…”
“कंपालाच्या झोपडपट्टी पासून ते टी 20 विश्वचषक” युगांडा खेळाडूंनी घेतली गगन भरारी