यंदाच्या आयसीसी टी20 विश्वचषकाला (ICC T20 World Cup) (2 जून) रोजी शुभारंभ झाला. हा टी20 विश्वचषक अमेरिका (America) आणि वेस्ट इंडीज (West Indies) या दोन देशात खेळला जात आहे. परंतु भारतीय संघ वेळापत्रकानुसार त्यांचा पहिला सामना (5 जून) रोजी आयर्लंडविरुद्ध खेळणार आहे. तत्पूर्वी भारतीय संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविड यांचा या टी20 विश्वचषकानंतर कार्यकाळ संपणार आहे.
भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मानं (Rohit Sharma) मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्याबाबत (Rahul Dravid) खुलासा केला आहे. रोहित म्हणाला की, त्यानं राहुल द्रविड यांना मुख्य प्रशिक्षकपदी रहा, असं पटवण्याचा खूप प्रयत्न केला, पण तो यशस्वी झाला नाही. रोहित शर्मानं आयर्लंडविरुद्धच्या टी20 विश्वचषक 2024च्या पहिल्या सामन्यापूर्वी हे सांगितले. बुधवारी विश्वचषक स्पर्धेतील 8व्या सामन्यात भारत आणि आयर्लंड हे दोन संघ भिडणार आहेत. हा सामना भारतीय वेळेनुसार रात्री 8.00 वाजता होणार आहे. 15 वर्षांपूर्वी टी-20 विश्वचषकात दोन्ही संघ एकदाच भिडले होते.
रोहित शर्मानं (Rohit Sharma) मंगळवारी पत्रकार परिषदेत राहुल द्रविड यांना (Rahul Dravid) कसं रोखण्याचा प्रयत्न केला हे सांगितले. रोहित म्हणाला “मी राहुल द्रविड यांना प्रशिक्षकपदावर राहण्यासाठी समजवण्याचा प्रयत्न केला, पण ते तयार झाले नाहीत. माझे पहिले आंतरराष्ट्रीय कर्णधार राहुल द्रविड होते. ते एक उत्तम आदर्श आहेत. मी त्यांना भारतीय संघातून जाताना पाहू शकत नाही.” राहुल द्रविड यांनी स्पष्ट केलं आहे की, ते भारताच्या मुख्य प्रशिक्षक पदासाठी मुदत वाढवणार नाहीत.
टी20 विश्वचषकासाठी भारतीय संघ- रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, सुर्यकुमार यादव, रिषभ पंत, संजू सॅमसन, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह
राखीव खेळाडू- शुबमन गिल, रिंकू सिंह, खलील अहमद, आवेश खान
महत्त्वाच्या बातम्या-
भारताच्या प्रशिक्षक पदासाठी गौतम गंभीर योग्य! भारताच्या माजी प्रशिक्षकानं दिली प्रतिक्रिया
स्काॅटलंडनं जिंकला टाॅस; प्रथम फलंदाजीचा निर्णय, जाणून घ्या दोन्ही संघांच्या प्लेइंग 11
वसीम जाफरची टी20 विश्वचषकबाबत भविष्यवाणी, म्हणाला ‘अंतिम सामना’ या दोन संघांमध्येच होणार!